शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाविरोधात आंदोलन

By admin | Updated: October 3, 2015 23:47 IST

मनगू सरगर यांचे सदस्यत्व रद्द करा : पालिका कर्मचाऱ्यांची मागणी; निदर्शने

सांगली : महापालिकेचे मुकादम गणपत भालचीम यांना मारहाण करणारे नगरसेवक मनगू सरगर यांचे पद रद्द करा, अशी मागणी शनिवारी महापालिका कामगार सभेच्यावतीने करण्यात आली. या घटनेचा व नगरसेवकाचा निषेध करीत कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली. महापालिका कामगार सभेचे सरचिटणीस दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. मुकादमास मारहाण करणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्तांच्या गैरहजेरीत हे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मुकादम भालचीम यांची कोणतीही चूक नसताना त्यांना कामावर असताना मारहाण करण्यात आली. सरगर व लेंगरे यांनी मुकादमास मारहाण करून जाणून बुजून शासकीय कामात अडथळा आणलेला आहे. त्यांच्यावर याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे. महापालिकेत अत्यंत अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही उर्वरित कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत नगरसेवकांची ही कृती शोभनीय नाही. काही नगरसेवक कर्मचाऱ्यांना अत्यंत हीन वागणूक देत आहेत. त्यामुळे या सर्वप्रकरणात लक्ष घालून आयुक्तांनी संबंधित नगरसेवकावर कारवाई करावी. त्यांचे सदस्यत्व रद्द करावे. मारहाणप्रकरणी कोणतीही कारवाई प्रशासकीय स्तरावर झाली नाही, तर संघटनेला नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी नगरसेवक सरगर यांचा जाहीर निषेधही करण्यात आल्या. आंदोलनात एकनाथ माळी, विकास कांबळे, चिंतामणी कांबळे, बापू कुदळे, नारायण हजारे, गजानन शिंगे, आर. के. यादव आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)