अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच घोटला गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 13:55 IST2020-10-19T13:49:28+5:302020-10-19T13:55:45+5:30
crimenews, child, sanglinews अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच गळा आवळल्याची हद्यद्रावक घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच घोटला गळा
सांगली : अवघ्या ४२ तासाच्या नवजात मुलीचा आईनेच गळा आवळल्याची हद्यद्रावक घटना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात घडली. याप्रकरणी सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर जि. बेळगाव) असे त्या निर्दयी आईचे नाव असून तिच्यावर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्नाटकातील सुमित्रा प्रसुतीसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर शनिवारी रात्री तिने मुलीचा गळा आवळला. ही घटना पाहणाऱ्या त्याच वार्डातील दुसऱ्या महिलेने याची माहिती डॉक्टरांना दिली होती. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी त्या नवजात मुलीवर तातडीने उपचार सुरु केले होते.
उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. तिच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खूणा दिसून येत होत्या. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने विश्रामबाग पोलिसात याबाबत फिर्याद देत निर्दयी आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.