मोहन कोडग यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:40+5:302021-03-05T04:25:40+5:30

फोटो ओळ : सांगली येथे सुभेदार मोहन कोडग यांचा सेवानिवृत्तनिमित्त नगरसेवक विष्णू माने व शहाजी शिंदे यांनी सत्कार केला. ...

Mohan Kodag felicitated on the occasion of his retirement | मोहन कोडग यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

मोहन कोडग यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

फोटो ओळ : सांगली येथे सुभेदार मोहन कोडग यांचा सेवानिवृत्तनिमित्त नगरसेवक विष्णू माने व शहाजी शिंदे यांनी सत्कार केला.

लिंगनूर : सांगली येथे सेवानिवृत्त सैनिक मोहन कोडग यांचा नागरिकांच्यावतीने नगरसेवक विष्णू माने व एकलव्य शिक्षण समूहाचे संस्थापक शहाजी शिंदे यांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला होता. यावेळी सुभेदार मोहन कोडग यांची सांगली रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

तीस वर्षे देशाची सेवा करावयास मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. या पुढेही समाजसेवा करणार आहे. माझ्या या तीस वर्षांच्या सेवेमध्ये माझ्या कुटुंबाचा त्याग तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मोहन कोडग यांनी केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे, पांडुरंग कोडग, किशोर गिरटकर, राजेंद्र शिरदवडे, पोपट कोरे आदी उपस्थित होते. अशोक घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संजय गडदे यांनी केले होते. अरूण परीट यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन विजय कोडग, अक्षय कोडग, समृद्धी कोडग व साक्षी कोडग यांनी केले.

Web Title: Mohan Kodag felicitated on the occasion of his retirement