शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकी गेली उडत, शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

इस्लामपूर : आमदारकी गेली उडत, अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या. जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यांनी राहिलेली रक्कम व्याजासह ...

इस्लामपूर : आमदारकी गेली उडत, अगोदर शेतकऱ्यांच्या घामाचा दाम द्या. जिल्ह्यातील पूर्ण एफआरपी न दिलेल्या कारखान्यांनी राहिलेली रक्कम व्याजासह द्यावी. यापुढे गाळप होणाऱ्या ऊसाची एफआरपी एकरकमी द्यावी, या मागणीसाठी ८ मार्चला राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिषेक घालणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एस. यु. संदे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

संदे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेत तो अमलातही आणला. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यातही एकरकमी एफआरपी देणे अपेक्षित होते. तथापि, जिल्ह्यातील कारखानदारांची तशी इच्छा दिसत नाही. त्यामुळे संघटनेने पुढाकार घेऊन नोव्हेंबरमध्ये कडेगाव येथे बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले. आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा आणि उदगिरी कारखाना एकरकमी एफआरपी देईल असे जाहीर केले. मात्र, इतरांनी हा तोडगा न पाळता निराशा केली.

ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील सोनहिरा, उदगिरी आणि दालमिया हे तीन कारखाने वगळता इतर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले. १५ दिवसांच्या आत एफआरपी देण्याच्या कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे या कारखानदारांना सुबुद्धी सुचावी आणि शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्यांना त्वरित मिळावेत, यासाठी कोविड आणि जमावबंदी आदेशाचे पालन करून ८ मार्चला सकाळी अकरा वाजता राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील बापूंच्या पुतळ्याला हा अभिषेक घालणार आहोत.

यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, रमेश पाटील उपस्थित होते.

चौकट

घामाचा दाम मिळवून देणे आमच्यासाठी आमदारकीपेक्षा मोठे

राजू शेट्टी यांच्या आमदारकीसाठी दबाव टाकणारे हे आंदोलन आहे का? या प्रश्नावर संदे यांनी आमदारकी गेली उडत, त्यापेक्षा आम्हांला शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई लढणे महत्त्वाचे वाटते. त्याच्या घामाचा दाम मिळवून देणे आमच्यासाठी आमदारकीपेक्षा मोठे आहे, असे स्पष्ट केले.