अहमदाबादला अडकलेल्या तासगावच्या प्रवाशांना दिलासा, विमान दुर्घटनेमुळे पडले होते अडकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:40 IST2025-06-13T14:35:43+5:302025-06-13T14:40:20+5:30

तासगाव : अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण विमान व्यवस्था कोलमडून गेली. उड्डाणे रद्द झाल्यामुळे सहलीला गेलेले तासगाव तालुक्यातील ...

MLA Rohit Patil arranged to bring back 40 passengers from Tasgaon taluka who were stranded at Ahmedabad airport | अहमदाबादला अडकलेल्या तासगावच्या प्रवाशांना दिलासा, विमान दुर्घटनेमुळे पडले होते अडकून

अहमदाबादला अडकलेल्या तासगावच्या प्रवाशांना दिलासा, विमान दुर्घटनेमुळे पडले होते अडकून

तासगाव : अहमदाबादविमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण विमान व्यवस्था कोलमडून गेली. उड्डाणे रद्द झाल्यामुळे सहलीला गेलेले तासगाव तालुक्यातील ४५ प्रवासी अहमदाबादविमानतळावर अडकून पडले. अडकलेल्या प्रवाशांना आमदार रोहित पाटील यांनी थेट अहमदाबाद ते तासगावपर्यंत आणण्याची केली सोय केली.

तासगाव तालुक्यातील ४५ प्रवासी अहमदाबादहून पुण्याला विमानाने येणार होते. दरम्यान, दुपारी अहमदाबाद-लंडन विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर विमानतळावरील सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आली. तासगाव तालुक्यातील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकून पडल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
 
आमदार रोहित पाटील यांना तासगावमधील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना दिलासा दिला. त्यांना अहमदाबादहून थेट तासगावपर्यंत सुखरूप आणण्याची व्यवस्था केली आहे. अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर धुराचे लोट व विमानतळावर झालेली गडबड पाहून तासगावमधील प्रवासीही धास्तावले होते. माउंट अबू, राजस्थान, साबरमती गुजरात याठिकाणी हे प्रवासी सहलीसाठी गेले होते.

शुक्रवारी प्रवासी तासगावात पोहोचणार

तासगावमधील सहलीसाठी गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असून ते उद्यापर्यंत तासगावमध्ये पोहोचतील, अशी माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.

Web Title: MLA Rohit Patil arranged to bring back 40 passengers from Tasgaon taluka who were stranded at Ahmedabad airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.