शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Sangli Politics: गोपीचंद पडळकर विधानसभा कोठून लढणार ?, ब्रह्मानंद पडळकर यांचीही ‘होम पिच’वर चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 17:51 IST

शिंदेसेना अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित  

लक्ष्मण सरगरआटपाडी: भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तयारीच्या सूचना दिल्याचेही बोलले जात आहे; मात्र ते होम पिच असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढणार की जतमधून ? हे अद्याप अस्पष्ट आहे; मात्र त्यांनी १ जूनपासून जत तालुक्याचा दौरा निश्चित केला असून जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपाचे स्टार प्रचारक असलेले गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे सदस्य आहेत. जत विधानसभा मतदारसंघात धनगर, लिंगायत व बहुजन समाजाची संख्या मोठी आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी लाेकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे जत तालुक्यात भाजपाकडे सध्या सर्व समाजाला एकसंघ ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही. त्यामुळे जतमधून विधानसभा लढण्यासाठी भाजपकडून पडळकर यांची चाचपणी सुरू आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून होम पिच असलेल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघाबाबत पडळकर काय भूमिका घेणार ? हेही महत्त्वाचे ठरणार आहे. महायुती झाल्यास नेमका मतदारसंघ कोणाला मिळणार ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शिंदेसेनेकडे मतदारसंघ कायम राहिल्यास पडळकर यांची भूमिका कोणती राहणार ? हेही स्पष्ट नाही. कारण दिवंगत आमदार अनिल बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. २०१९ च्या निवडणुकीत बाबर यांच्या विजयात पडळकरांनी मोठे योगदान दिले होते; मात्र यानंतर २०१९ ची चूक सुधारणार असल्याचे त्यांनी जाहीररित्या अनेक कार्यक्रमामध्ये बोलून दाखवले आहे.आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर मतदारसंघातील परिस्थिती बदलली असली तरी शिंदेसेना पुन्हा मतदारसंघावर दावा करत अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना मैदानात उतरवणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वैभव पाटील यांनीही तयारी सुरू केली आहे. गोपीचंद पडळकर जर जतमधून लढणार असतील तर त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर खानापुरातून लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी आतापासूनच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. गोपीचंद पडळकर हे कोणत्या मतदारसंघातून लढणार ? यावरच खानापूर विधानसभेच्या आगामी निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाGopichand Padalkarगोपीचंद पडळकर