शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Sangli Politics: राजेंद्रअण्णांच्या आडून पडळकरांची खेळी, अंतिम आदेश हायकमांडचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 5:14 PM

आमदार पडळकर इच्छुक असताना देशमुखांचे नाव पुढे कसे आले?

दिलीप मोहितेविटा : खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०२४ साठी शड्डू ठोकला आहे. त्यांचे बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी २०२४ चा आमदार आटपाडी तालुक्याचाच असे सांगत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचे नाव पुढे आणले आहे. आमदार पडळकर इच्छुक असताना देशमुखांचे नाव पुढे कसे आले? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. मात्र, देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पडळकर बंधू आमदारकीवर निशाणा साधणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.गत निवडणुकीत पडळकर बंधूंनी आमदार अनिल बाबर यांना मदत केली होती. परंतु, निवडणुकीनंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप करीत त्यांनी आमदार बाबर यांना लक्ष्य केले. आमदार पडळकर जाहीर सभेत आमदार बाबर उपस्थित असतानाही त्यांचे नाव न घेता थेट विरोध करीत आहेत.ब्रम्हानंद पडळकरांनी तर थेट राजेंद्रअण्णा देशमुख यांचे नावच २०२४ साठी जाहीर करून टाकले आहे. परवा विट्यात त्यांनी आमदार बाबर व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना दोन वेळा सहकार्य करणाऱ्या देशमुख यांना २०२४ ला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

वास्तविक विधानसभेसाठी पडळकरांनी स्वत:ची उमेदवारी यापूर्वी जाहीर केली आहे. मग आता देशमुख यांच्या नावाची घोषणा कशी झाली? असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र, देशमुख यांचे नाव जाहीर केले असले तरी उमेदवारी पडळकरांचीच राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पडळकर बंधूंनी देशमुख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दोघांपैकी एकाने आमदारकीवर निशाणा साधण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी विसापूर सर्कलपासून गावोगावी भेट देऊन ताकद वाढविण्याचे काम सुरू केले आहे.

अंतिम आदेश हायकमांडचा..आमदार पडळकर यांनी खानापूरसह जतच्या जागेसाठीही फिल्डिंग लावल्याचे समजते. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला खानापूरची जागा मिळणार असल्याचे निश्चित समजले जाते. त्यावेळी मित्रपक्षाच्या उमेदवाराचाच प्रचार करण्याचा आदेश भाजपचे हायकमांड देऊ शकतात. हायकमांडचा अंतिम आदेश आल्यास पडळकर बंधू काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाGopichand Padalkarगोपीचंद पडळकर