Crime News Sangli: कामेरी येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:41 IST2022-06-13T12:40:17+5:302022-06-13T12:41:09+5:30
सोनाली ही आपल्या दोन मुलांसमवेत माहेरी आली होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास दोन्ही मुलांना सोबत घेत घरी कोणास काही न सांगता निघून गेली.

Crime News Sangli: कामेरी येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु
इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे माहेरी आल्यानंतर ३० वर्षीय विवाहिता आपल्या दोन मुलांना सोबत घेत बेपत्ता झाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. अद्याप या विवाहितेचा आणि मुलांचा शोध लागलेला नाही.
सोनाली राजेश पाटोळे (वय ३०), विराज (८) आणि स्वराज (६, तिघे रा. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ) अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत भाऊ सूर्यकांत शांताराम मदने यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.
सोनाली ही आपल्या दोन मुलांसमवेत माहेरी कामेरी येथे आली होती. शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ती आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेत घरी कोणास काही न सांगता निघून गेली आहे. भाऊ सूर्यकांत हा घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीने ही घटना सांगितली. त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.