शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Milk Supply : आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही सांगली जिल्ह्यातील दूधसंकलन बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:05 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूधदरवाढीचे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होते. सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोरुन दूध संकलनासाठी आणलेले दूधही रस्त्यावर ओतून देत दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज दिली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही सांगली जिल्ह्यातील दूधसंकलन बंदचदूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूधदरवाढीचे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम होते. सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोरुन दूध संकलनासाठी आणलेले दूधही रस्त्यावर ओतून देत दूधउत्पादक शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केद्रांना समज दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन आणखीन व्यापक केले आहे. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा परिसरात दुध संकलन केंद्रावर दूध संकलन होत असल्याचे वृत्त समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेत हे केंद्र बंद पाडले, तसेच संकलनासाठी आणलेले दूध रस्त्यावर ओतून दिले. यामुळे सोनहिरा परिसरात बुधवारी ४० हजार लिटर संकलन ठप्प झाले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील दूधउत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.सोमवारी सुरु झालेल्या या दूध आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे, तरीही सोनहिरा परिसरातील ४० हजार लिटर दुध संकलन बंद ठेऊन सरकारचा निषेध करण्यात आला. कवठेमहांकाळ येथे जुन्या स्टँडवर सकाळी ८ वाजता खा. संजयकाका पाटील यांच्या कृष्णा दूध संघ आणि शेजाळ अ‍ॅग्रोमधून दूध संकलन आणि वितरण आंदोलकांनी बंद पाडले. पंचवीस कॅन दूध रस्त्यावर ओतले. माळवाडी (ता. पलूस) येथील सांगली-माळवाडी मुक्कामी दोन बसेसच्या आंदोलकांनी काचा फोडल्या आहेत. जिल्ह्यात दोन दिवस स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते. मंगळवारी रात्री दूध संघ आणि खासगी डेअरी चालकांनी छुप्या पध्दतीने दूध संकलन आणि वितरण सुरु केले होते. यामुळे आंदोलकांनी दूध संघ आणि डेअरी चालकांच्या विरोधातील आंदोलनाची धार तीव्र केली आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या कृष्णा दूध संघाकडून कवठेमहांकाळ तालुक्यातील दूध संकलन चालू होते. दूध संकलन करणारे वाहन ताब्यात घेवून तेथील पंचवीस कॅन दूध रस्त्यावर ओतून आंदोलकांनी राज्य शासनाचा त्यांनी निषेध केला. शेजाळ अ‍ॅग्रोच्या दूधाचेही संकलन थांबवून त्यांच्याकडील दूधही रस्त्यावर ओतले. एका दूध उत्पादक शेतकºयास दुधाचा अभिषेक घालण्यात आला. शासनाचा निषेध नोंदवत हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले. कवठेमहांकाळ येथील दोन दूध संकलन केंद्राची मोडतोड करून तेथील संकलन बंद पाडले. स्वाभिमातनी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली आहे. दूध उत्पादक शेतकरीही मोठ्या उत्साहाने आंदोलनात सहभागी होत आहेत.माळवाडी (ता. पलूस) येथील सांगली-माळवाडी या दोन बसेस मंगळवारी रात्री १० वाजता मुक्कामी गेल्या होत्या. या बसेसवर बुधवारी पहाटे दगडफेक करुन काचा फोडल्या आहेत. यात दोन्ही बसेसचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगारातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी शहरातील आणखीन दोन ठिकाणचे दूध संकलन केंद्रे फोडली. जुन्या बस स्थनाकावर हजारो लिटर दुध ओतून दिले. तसेच चोरून दूध संकलन करणाऱ्या आणि दूध वाहतूक करणारी वाहने अडवून कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतून देण्यास भाग पाडले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाSangliसांगलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना