शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
2
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
3
बिहार फत्ते; आता 'या' दोना राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
4
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
5
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
6
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
7
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
8
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
9
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
10
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
11
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
12
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
13
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
14
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
15
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
16
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
17
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
18
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
19
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
20
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: विट्यात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा म्हसवडचा आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:29 IST

नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली

विटा : विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी रणजित प्रल्हाद सरतापे (वय ३४, रा. म्हसवड, ता.माण, सध्या रा. औंध, ता. खटाव, जि. सातारा) यास पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातील ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. विटा येथील शाहूनगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.सातारा जिल्ह्यातील म्हसवड (ता. माण) येथील संशयित रणजित सरतापे हा विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन विटा येथील नेवरी रस्त्यावरील शाहूनगर फलकाजवळ थांबला असल्याची माहिती विटा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील राजेंद्र भिंगारदेवे व श्रीकृष्ण सरगर यांना मिळाल्यानंतर पथकाने शाहूनगर येथे सापळा लावला.विट्याचे पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील व पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागातील हवालदार अमोल पाटील, राजेंद्र भिंगारदेवे, सचिन खाडे, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, किरण पाटील, अमोल कदम, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, श्रीकृष्ण सरगर, आदेश केदार, रमेश कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बनावट पिस्तूल, दुचाकी ताब्यातपोलिस आल्याची माहिती मिळताच संशयित सरतापे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल व दुचाकी असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Mhaswad man arrested in Vita with illegal pistol.

Web Summary : Police in Vita arrested a man from Mhaswad for possessing an illegal homemade pistol. Authorities seized the pistol and a motorcycle, worth ₹1 lakh, during the operation near Shahunagar. The arrest occurred amidst municipal election activity.