शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करून घराबाहेर काढले, सांगलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 18:40 IST

सांगली : मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढल्याबद्दल पती पंकज महादेव कोळेकर, सासू अंजना महादेव कोळेकर, सासरे ...

सांगली : मुलगी झाल्यामुळे विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढल्याबद्दल पती पंकज महादेव कोळेकर, सासू अंजना महादेव कोळेकर, सासरे महादेव कोळेकर, दीर विनायक कोळेकर, जाऊ स्वप्नाली कोळेकर (रा. संभाजीनगर, सामाजिक न्यायभवनसमोर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विवाहिता सोनाली कोळेकर (वय २१) हिने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनाली कोळेकर हिचा एप्रिल २०२२ मध्ये पंकज याच्याशी विवाह झाला आहे. विवाहानंतर त्यांना जानवी नावाची मुलगी आहे. लग्नानंतर सोनाली हिचा सासरी छळ सुरू होता. किरकोळ कारणावरून पती, सासू मारहाण करीत होते. दीर-जाऊ उपाशी ठेवत होते. ‘तुझ्या आईला पाच मुली आहेत. तुलाही तशाच मुली होतील,’ असे म्हणून मानसिक व शारीरिक छळ करीत होते. दि. २७ रोजी सोनाली यांची आई भेटण्यास आली. तेव्हा सासूने तिला ‘आमच्या मुलाचे दुसरे लग्न करायचे आहे,’ असे सांगितले. कारण विचारल्यानंतर ‘हिलापण तुमच्यासारख्याच मुली होतील,’ असे म्हणून हिणवले. पतीने देखील सोनाली हिच्या आईला, ‘माझे इच्छेविरुद्ध लग्न केले आहे, मला सोडचिठ्ठी पाहिजे,’ असे सांगितले. दीरानेदेखील सोनाली यांच्या वडिलांशी वाद करून ‘तुमची मुलगी पांढऱ्या पायाची आहे,’ असे म्हटले. त्यानंतर सर्वांनी मुलीस घेऊन जा, असे सांगून घराबाहेर हाकलले. अखेर सोनाली हिने पती, सासू, सासरे, दीर, जाऊ यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.

टॅग्स :Sangliसांगलीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस