शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

सांगलीत प्रवाशाचा अपहरण करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 21:53 IST

सांगली : रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला.

ठळक मुद्देतिघांना अटक लूटमारप्रकरणी अटक केल्यानंतर खुनाचा लागला छडाजामीन मंजूर झाला नसता, तर सूर्यवंशी यांचा खून झाला नसता.पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा लावल्यानंतर जाधवच्या मुलाने ‘हे काहीच नाही, यापेक्षाही मोठे काम केले आहे’,

सांगली : रिक्षाचालक पिता-पुत्रासह तिघांनी गजानन किसन सूर्यवंशी (वय ४५, रा. अहिल्यानगर, कुपवाड) या प्रवाशाला लुबाडण्यासाठी त्याचे अपहरण करुन नंतर निर्घृण खून केला. लूटमारीच्या दुसºया एका गुन्'ात या तिघांना अटक केल्यानंतर शुक्रवारी पहाटे खुनाची ही घटना उघडकीस आली. सांगलीवाडीतील कदमवाडी येथे उसाच्या शेतात सूर्यवंशी यांचा मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटविण्यात शहर पोलिसांना यश आले.नितीन सुभाष जाधव (वय ४२), त्याचा अल्पवयीन मुलगा व अमृत संभाजी पाटील (२१, तिघे रा. कलानगर, सांगली) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.गजानन सूर्यवंशी हे तानाजी चौकातील ‘जय दीपक’ हॉटेलमध्ये कामाला होते. २२ नोव्हेंबरला ते रात्री नऊ वाजता हॉटेलमधून घरी जाण्यास निघाले होते. वखारभागमार्गे ते कॉलेज कॉर्नरकडे जात होते. बँक आॅफ बडोदाजवळ ते गेले असता, पाठीमागून रिक्षातून (क्र. एमएच १० डब्ल्यू ६४१) नितीन जाधवसह तिघे आले. त्यांनी सूर्यवंशी यांना, अहिल्यानगर येथे सोडतो, असे म्हणून रिक्षात घेतले. नंतर रिक्षातच त्यांना बेदम मारहाण केली. सूर्यवंशी यांनी, पोलिसांत तक्रार करतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तिघांनी त्यांना बायपासमार्गे सांगलीवाडीतील कदमवाडीत शेतात नेले. तेथे त्यांच्यावर कुºहाडीने हल्ला केला. गळ्यावर वार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून तिघेही घरी गेले. अंघोळ करुन ते रिक्षाने पुन्हा सांगलीत तरुण भारत क्रीडांगणावजवळील बस थांब्यावर आले.तेथे बुधगाव (ता. मिरज) येथील रामदास घोडके बसच्या प्रतीक्षेत थांबले होते. या तिघांनी त्यांनाही, बुधगावला सोडतो, असे म्हणून रिक्षात घेतले व बायपास रस्त्यावरुन त्यांनी न्यू प्राईड सिनेमागृहाकडे रिक्षा वळविली. सिनेमागृहाजवळ रस्त्याकडेला अंधारात त्यांनी रिक्षा थांबविली व घोडके यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या, आठ हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला.. या घटनेनंतर घोडके यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना संशयितांचे वर्णन व रिक्षाचा क्रमांक सांगितला. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करुन शोध सुरु केला. पण संशयितांचा सुगावा लागला नाही. रिक्षा क्रमांकावरुन नितीन जाधव याचा शोध लागला. मात्र तो सापडला नाही. त्याच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. 

बढाई मारायला गेला आणि अडकला...नितीन जाधवच्या मुलास गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. तो नशेत होता. पोलिसांनी त्याला रामदास घोडके यांना लुटल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. तोपर्यंत पोलिसांना गजानन सूर्यवंशी यांच्या खुनाबद्दल काहीच माहीत नव्हते. पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा लावल्यानंतर जाधवच्या मुलाने ‘हे काहीच नाही, यापेक्षाही मोठे काम केले आहे’, असे सांगितले. पोलिसांनी काय काम केले आहेस, अशी विचारणा केली. यावर त्याने, मला काय विचारताय, अमृत पाटीलला विचारा, असे सांगितले. त्यानंतर अमृतलाही ताब्यात घेतले. रामदास घोडके यांना लुटण्यापूर्वी गजानन सूर्यवंशी यांचे अपहरण करुन त्यांचा खून केल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर मग नितीन जाधव यालाही अटक केली. तिघांनी शुक्रवारी पहाटे सूर्यवंशी यांना मारलेले ठिकाण दाखविले. तिथे त्यांचा मृतदेहही सापडला.पिता-पुत्राकडून दुसरा खूननितीन जाधव पिता-पुत्रांनी सहा महिन्यापूर्वी पंचशीलनगरमधील शशिकांत पाटील यांचाही अशाचप्रकारे खून केला होता. बायपास रस्त्यावरुन चालत जाणाºया पाटील यांना त्यांनी पंचशीलनगरला सोडतो, असे म्हणून रिक्षात घेतले. पण तेथून रिक्षा त्यांनी बायपास पुलावर घेतली. तिथे पाटील यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकून दिला होता. त्यावेळी जाधव पिता-पुत्रासह तिघांना अटक केली होती. पण ते जामिनावर बाहेर आले. त्यांना जामीन मंजूर झाला नसता, तर सूर्यवंशी यांचा खून झाला नसता.

 

टॅग्स :Crimeगुन्हाSangliसांगलीPoliceपोलिस