मैनाक घोष सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:52 IST2026-03-28T11:52:13+5:302026-03-28T11:52:31+5:30
अशोक काकडे यांची कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नतीवर बदली

मैनाक घोष सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी
सांगली : धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगलीच्याजिल्हाधिकारीपदी नियुक्ती शुक्रवारी झाली. सध्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. ते डॉ. मंगेश गोंदावले यांची जागा घेतील.
२०१९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या डॉ. घोष यांनी बायोकेमिस्ट्री विषयात पीएचडी केली आहे.त्यांनी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना आपल्या पारदर्शी कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण केली होती.
सप्टेंबर २०२५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी तुळजापूरसह पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन मदतकार्याचे नेतृत्व केले. या घटनेमुळे त्यांच्या संवेदनशील आणि जबाबदार प्रशासकीय दृष्टिकोनाची राज्यभर दखल घेतली गेली होती.