शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत

By संतोष कनमुसे | Updated: October 27, 2024 20:34 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चर्चा सुरू आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत वेगळीच रंगत आली आहे, कारण या पाच वर्षात राज्यात वेगळीच राजकीय समीकरणे झाली आहेत. ज्या पक्षांनी २०१९ च्या निवडणुका एकमेकांच्याविरोधात लढल्या, तेच पक्ष आज सोबत आले आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामुळे या दोन्ही पक्षातील दोन्ही गट एकमेकांविरुद्ध लढत आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदार संघातील लढतीमध्ये रंगत आली आहे,राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आणि भाजपाचे सत्यजित देशमुख यांच्यात लढत असणार आहे.  पण भाजपामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. जर ही बंडखोरी झाली तर यावरही येथील लढतीचे गणित अवलंबून आहे. 

"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

शिराळा विधानसभा मतदारसंघातील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक मैदानात आहेत, तर महायुतीकडून भाजपा नेते सत्यजित देशमुख यांची उमेदवारी काल जाहीर झाली आहे. यामुळे या मतदारसंघातील लढत जोरदार होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभामध्ये येतो, जूनमध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी दिली होती, पण महायुतीचे धैर्यशील माने यांनी विजय खेचून आणला. दोन्ही बाजूंनी आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. 

बंडखोरी झाली तर अडचणी वाढणार?

या मतदारसंघात शिराळा तालुका पूर्ण येतो आणि वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश होतो. या गावांतील मतदान निर्णायक असते. भाजपाचे सम्राट महाडिक यांच्या गटाची ताकदही मोठी आहे. उमेदवारीसाठी सम्राट महाडिक यांनीही दावा केला होता. वाळवा तालुक्यातील ४८ गावांसह त्यांचा शिराळा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्यांनीही गेल्या काही वर्षापासून तयारी केली होती. पण उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आज माध्यमांना अपक्ष अर्ज दाखल करुन निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता या मतदारसंघात मोठी रंगत आली आहे. हा मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी भाजपाने मोठी तयारी केली आहे. पण, जर महाडिक यांनी बंडखोरी केली तर भाजपाच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काय?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार मानसिंगराव नाईक मैदानात होते त्यांच्याविरोधात शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. महाडिक हे अपक्ष लढूनही त्यांना ४६ हजार मतदान झाले होते. २०१९ ला राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक यांना १,०१,९३३ एवढी मत मिळाली होती तर शिवाजीराव नाईक यांना ७६,००२ मत मिळाली होती. तर दुसरीकडे यावेळी भाजपला भगतसिंग नाईक यांची ताकद मिळणार आहे. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतांचं गणित काय?

जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांना ९ हजारांचे मताधिक्य होते. महाविकास आघाडीच्या सत्यजित पाटील यांना ९०,००१ एवढी मत मिळाली होती, तर महायुतीच्या धैर्यशील माने यांना ८०,७२० एवढी मत मिळाली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना १७,४९९ मत मिळाली होती.

शिराळा विधानसभेतील मतदारसंख्या 

शिराळा विधानभा मतदारसंघात १ लाख ५५ हजार ३७६ एवढे पुरुष मतदार आहेत, तर  १ लाख ४९ हजार ८२९ एवढ्या स्त्रिया मतदार आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघात सप्टेंबर २०२४ च्या अखेर एकुण ३ लाख ०५ हजार २०८ एवढे मतदार आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४SangliसांगलीElectionनिवडणूक 2024BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस