Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या अडचणी वाढणार! सदाभाऊ खोत जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत लक्षवेधी मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:26 IST2025-03-07T12:24:13+5:302025-03-07T12:26:24+5:30
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या अडचणी वाढणार! सदाभाऊ खोत जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत लक्षवेधी मांडणार
Maharashtra Politics ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्या प्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी लक्षवेधीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला आहे.
...अन् महायुती सरकारनं स्वत:चाच विक्रम मोडला; देवेंद्र फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत अपहार झाला असून तात्काळ संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी आज केली आहे. विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार खोत यांनी ही मागणी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून आमदार जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर घोटाळ्याचे आरोप होत आहेत. बँकेच्या कामात अनियमितता असून घोटाळे झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत मागील वर्षी माजी खासदार राजू शेट्टी यांनीही आरोप केले होते. याबाबत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनही दिले होते.
आरोप काय झाले होते?
घोटाळ्यामध्ये सोने तारण,ठेवीवरील व्याजासह,दुष्काळ,अतिवृष्ट,अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई चे पैसे शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. घोटाळा सहा शाखांमध्ये झालेला असून यामध्ये बँकेने बोगस ताळेबंद दाखविल्याचे यात म्हटले होते.