शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
6
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
7
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
8
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
9
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
10
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
11
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
12
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
13
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
14
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
15
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
16
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
18
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; आरोपी 3 मुलांचा बाप!
19
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
20
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
Daily Top 2Weekly Top 5

जतसाठी पाणी योजनेचे दरवाजे खुले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:43 IST

विक्रम सावंत यांच्या प्रचारार्थ कर्नाटकचे उपमुख्यमंत्री प्रचारात

उमदी : महाराष्ट्र व कर्नाटकला लागून सीमेचा बांध असला तरी पाण्यासाठी जत तालुक्याला आमच्या पाणी योजनेचे दरवाजे कायम खुले राहतील, असे प्रतिपादन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.जत विधानसभेचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ उमदी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, कर्नाटकच्या महिला व बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री एस. आर. पाटील, सक्षणा सलगर, जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे, नाना शिंदे, पिराप्पा माळी, चनाप्पा होर्तिकर, रमेश पाटील, रेश्माका होर्तिकर, मोहन कुलकर्णी, बाबासाहेब कोडग उपस्थित होते. शिवकुमार म्हणाले, आमच्या गडीनाड भागात आल्यावर कर्नाटकात आल्यासारखेच वाटते. आम्ही आमच्या भागातील दुष्काळ जवळून अनुभवला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील आमच्या गडीनाड भागातील बांधवांची होरपळ होऊ नये, असे आम्हाला मनापासून वाटते. विक्रम सावंत यांची या भागाला पाणी मिळविण्यासाठीची धडपड मी जवळून बघतली आहे. तुम्ही विक्रम सावंत यांच्या पाठीशी राहा, जत तालुक्यातील गडीनाड गावासाठी आमच्या पाणी योजनेची दरवाजे कायम खुले राहतील, हा विश्वास देण्यासाठी मी आलोय. भाजपने कायमच फोडाफोडीचे धोरण स्वीकारले. जातीपातीत तर भांडणे लावलीच; पण पक्ष फोडण्याचे पाप ही केले. महाराष्ट्रातील शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली व एक डुप्लिकेट सरकार बनवले. या सरकारने आमच्या पंचसूत्रीची कॉपी करून जाहीरनामा प्रसिद्ध केला; पण या जाहीरनाम्याची गॅरंटी राहिली नाही. या सरकारप्रमाणेच डुप्लिकेट जाहीरनामा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आ. विक्रम सावंत म्हणाले, आम्ही विलासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहोत. मात्र, भाजप जातीपातीचा अजेंडा राबवून तालुक्याची शांतता भंग करू पाहत आहेत. अशा प्रवृत्तीला वेळीच गाडले पाहिजे.

महाराष्ट्रात धनगर समाजाला आरक्षण नाहीकर्नाटकात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. बहुसंख्येने लिंगायत समाज असला तरी आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून समाजाला न्याय दिला; पण महाराष्ट्रात धनगर समाजाला साधे आरक्षण दिले जात नाही हे दुर्दैव आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४jat-acजाटKarnatakकर्नाटकWaterपाणीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024