शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

Vidhan Sabha Election 2024: निवडणूक खर्चात तासगाव, खानापूर, शिराळा तालुका आघाडीवर; कोणत्या उमेदवाराने केला सर्वाधिक खर्च..जाणून घ्या

By संतोष भिसे | Updated: November 27, 2024 18:13 IST

अतिशय चुरशीच्या लढतीमुळे खर्चामध्येही उमेदवारांना हात ढिला सोडावा लागला

संतोष भिसेसांगली : विधानसभा निवडणुकीच्या खर्चात पहिल्या टप्प्यात तासगाव, खानापूर आणि शिराळा मतदारसंघ आघाडीवर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांनी प्रचार कालावधीतील १६ नोव्हेंबरपर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे.जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतील लढती प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात अतिशय चुरशीने झाल्या, त्यामुळे खर्चामध्येही उमेदवारांना हात ढिला सोडावा लागला. प्रचारकाळात तीनवेळा खर्च प्रशासनाकडे सादर करण्याचा नियम आहे. त्यानुसार काही उमेदवारांनी ८ नोव्हेंबरपर्यंतचा, तर काहींनी १६ नोव्हेंबरपर्यंतचा खर्च सादर केला आहे. १८ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रचार संपल्याने तत्पूर्वीच्या १६ नोव्हेंबरपर्यंतचा खर्च दिला आहे. खर्चाची मर्यादा ४५ लाख रुपये होती.मतदारसंघ आणि प्रमुख उमेदवारांचा खर्च असा :

  • तासगाव-कवठेमहांकाळ :रोहित पाटील - १६ नोव्हेंबरपर्यंत - २६ लाख ९३ हजार ५५५.संजय पाटील - १४ नोव्हेंबरपर्यंत - ३० लाख ८० हजार ३०८.
  • जत -गोपीचंद पडळकर - ६ नोव्हेंबरपर्यंत - ७ लाख ५८ हजार ३४६,तम्मनगौडा रवीपाटील - १६ नोव्हेंबरपर्यंत - १२ लाख ५७ हजार १३०.विक्रमसिंह सावंत - १६ नोव्हेंबरपर्यंत - १९ लाख १७ हजार २९३.
  • खानापूर-सुहास बाबर - १८ लाख ६ हजार ९२२,वैभव पाटील - २१ लाख ६३ हजार ४३५,राजेंद्रअण्णा देशमुख - ८ लाख ४५ हजार ७२ (तिघेही १६ नोव्हेंबरपर्यंत).
  • पलूस-कडेगाव -डॉ. विश्वजित कदम - ६ नोव्हेंबरपर्यंत - ८ लाख २७ रुपये,संग्रामसिंह देशमुख - ८ नोव्हेंबरपर्यंत - २ लाख ३८ हजार ३२०.
  • सांगली-जयश्री पाटील- ८ लाख ८३ हजार ९१९,पृथ्वीराज पाटील - १२ लाख २ हजार ९८ (दोघेही १२ नोव्हेंबरपर्यंत),सुधीर गाडगीळ - १६ नोव्हेंबरपर्यंत - १५ लाख ५४ हजार २८१.
  • इस्लामपूर -जयंत पाटील - ८ लाख ४६८ रुपये,निशिकांत पाटील - ८ लाख ९६ हजार ५७१ (दोघेही १२ नोव्हेंबरपर्यंत).
  • शिराळा-सत्यजित देशमुख - १९ लाख ९५ हजार १६७,मानसिंगराव नाईक - १७ लाख ४४ हजार ५०० (दोघेही १६ नोव्हेंबरपर्यंत).
  • मिरज -सुरेश खाडे - १५ लाख ८५ हजार ६३४,तानाजी सातपुते - १५ लाख ९४ हजार ४९६. (दोघेही १६ नोव्हेंबरपर्यंत)

अमित शाह यांचा खर्च सुरेश खाडे यांच्या खात्यातभाजप महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे व संजय पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ८ नोव्हेंबर रोजी झाली. या सभेचा ४ लाख ८९ हजार ९३२ रुपयांचा खर्च मिरजेतील उमेदवार सुरेश खाडे यांच्या हिशेबात धरण्यात आला आहे.

हेलिकॉप्टर्सचा खर्च पक्षाच्या खात्यातनिवडणुकीत प्रचारासाठी तब्बल ७५ हेलिकॉप्टर्स जिल्ह्यात विविध ठिकाणी उतरली. त्यांचा खर्च पक्षाच्या हिशेबात गृहीत धरण्यात आला. तेथील सभेचा खर्च मात्र संबंधित उमेदवाराच्या नावे पडला आहे.

सर्वच मतदारसंघांतील उमेदवारांचा निवडणूक खर्च मर्यादेतच आहे. निकाल लागल्यापासून २५ दिवसांपर्यंत खर्चाचा ताळमेळ सादर करण्यासाठी उमेदवारांना मुदत आहे. -डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळshirala-acशिराळाkhanapur-acखानापूरsanjaykaka patilसंजयकाका पाटीलMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीJayant Patilजयंत पाटीलRohit Patilरोहित पाटिलVishwajeet Kadamविश्वजीत कदमGopichand Padalkarगोपीचंद पडळकरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024