शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: जयंत पाटील यांची बालेकिल्ल्यातच मताधिक्यासाठी दमछाक, 'घड्याळ' राहिले आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 18:55 IST

युनूस शेख इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सलग आठवा विजय नोंदविताना आ. जयंत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली. पहिल्या ...

युनूस शेखइस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील सलग आठवा विजय नोंदविताना आ. जयंत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य वाढते ठेवण्याच्या परंपरेला दुसऱ्यांदा लढणाऱ्या निशिकांत भोसले-पाटील यांनी ‘ब्रेक’ लावल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पहिल्यांदाच निशिकांत पाटील यांनी २१ पैकी ५ फेऱ्यांमध्ये जयंत पाटील यांच्यावर आघाडी घेण्याची किमया करून दाखवली.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील ५७ पैकी २० गावांमध्ये निशिकांत पाटील यांनी आ. जयंत पाटील यांच्यापेक्षा मतांची आघाडी घेतल्याचे मतमोजणीनंतरच्या गावनिहाय आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जयंत पाटील यांना इस्लामपूर शहरातून सर्वाधिक ७ हजार २०३ इतके मताधिक्य मिळाले आहे.निशिकांत पाटील यांना भवानीनगर (२३२), बेरडमाची (९१), दुधारी (४८), खरातवाडी (२४), रेठरेहरणाक्ष (५९), शिरगाव (२१७), तुजारपूर (१०७), मर्दवाडी (४), गोटखिंडी (१), मिरजवाडी (१२), कारंदवाडी (१२५), तुंग (६०५), फाळकेवाडी (२७), मौजे डिग्रज (४६), ढवळी (२३३), कसबे डिग्रज (११३), दुधगाव (३१८), कवठेपिरान (४९७), सावळवाडी (१७८), समडोळी (७००), मालेवाडी (२७) अशा मतांची आघाडी वरील गावांतून मिळाली आहे.तर आ. जयंत पाटील यांना किल्ले मच्छिंंद्रगड (६४६), लवणमाची (९७), येडेमच्छिंद्र (६८), कोळे (१४२), नरसिंहपूर (२४६), बिचुद (१३२), ताकारी (४४६), शिरटे (४५१), गौंडवाडी (३०), बनेवाडी (११६), साटपेवाडी (१४), बहे (२६), मसुचीवाडी (१२३), हुबालवाडी (३३०), फार्णेवाडी-बी (९०), बोरगाव (६४४), साखराळे (८७५), जुने खेड (३), नवे खेड (१८१), इस्लामपूर (७२०३), वाळवा (२७५), अहिरवाडी (४२), पडवळवाडी (७७), गाताडवाडी (११३).बावची (५७३), कृष्णानगर (४), आष्टा (८१), पोखर्णी (४३), भडकंबे (२४९), नागाव (७१), काकाचीवाडी (२३८), रोझावाडी (५११), फार्णेवाडी-एस (१४५), बागणी (१६७), कोरेगाव (८३६), शिगाव (२८७) या गावांतून जयंत पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे.इस्लामपूर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चुरशीने होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात मतदारसंघातील राजकीय वातावरण नेहमीच तापलेले राहणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024