शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मदन पाटील यांनीच गद्दारीची बीजे रोवली

By admin | Updated: September 18, 2014 23:27 IST

दिनकर पाटील : सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

सांगली : बंडखोरी व गद्दारीची बीजे मदन पाटील यांनीच रोवली आहेत. त्यामुळे दुसऱ्यावर याप्रश्नी टीका करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही, असे मत माजी आमदार व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा मी अधिकृत उमेदवार असताना मदन पाटील यांनीच बंडखोरी केली होती. दाखवायचे आणि खायचे दात त्यांचेच वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना असा आरोप दुसऱ्यावर करण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीला त्यांनी गृहीत धरले नसल्याचे सांगितल्याने, विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ. आ. संभाजी पवार व मदन पाटील या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघासाठी काहीही केले नाही. वसंतदादा बँकेच्या प्रकरणात मदन पाटील यांनी तोंड उघडावे. त्यांचे मौन म्हणजे चोराला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. जनतेची एवढीच काळजी असेल, तर शेतकरी व कामगारांचे पैसे देण्याबाबत दादांच्या वारसदारांनी निर्णय घ्यावा. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, गेल्या २४ वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघात एक अपवाद वगळता काँग्रेस नेहमीच याठिकाणी पराभूत झाली आहे. येथील जनतेने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला आहे. पाचवेळा काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे आघाडी झाली, तर सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळावी. त्याबाबत आम्ही पक्षाकडे आग्रह धरला आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवारही आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला देण्यात येऊ नये. (प्रतिनिधी)एकत्र येऊन संस्था बुडविल्या दादा घराण्यात फूट नाहीच. वसंतदादांनी उभारलेल्या संस्था बुडविण्यासाठी ते एकत्रितच आहेत, अशी टीका दिनकर पाटील यांनी यावेळी केली. मदन पाटील यांनी राष्ट्रवादीवर आघाडीपूर्वीच टीका केल्याने, आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबतचा निर्णय घेण्यासाठी येत्या २१ तारखेला सांगलीतील पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.