शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:05 PM

जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.

ठळक मुद्देआवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

सांगली : माहे ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानींचे पंचनामे सुरु असुन जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.

11 हजार 207.29 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. त्यांचेही पंचनामे गतीने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.पंचानाम्याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे तासगाव तालुक्यातील 69 बाधित गावातील 68 हजार 209 शेतकऱ्यांचे 43 हजार 277 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 34 हजार 104 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 47 हजार 380 शेतकऱ्यांचे 25 हजार 97 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 9 हजार 7 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 19 हजार 853 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 48 हजार 356 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.आटपाडी तालुक्यातील 37 बाधितगावातील 598 शेतकऱ्यांचे 9315.30 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 356.50 हेक्टर बाधित झाले असून 4025 शेतकऱ्यांचे 2429.60 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 32 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 566 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.पलूस तालुक्यातील 36 बाधित गावातील 772 शेतकऱ्यांचे 19 हजार 988 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 317.80 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 2023 शेतकऱ्यांचे 1112.24 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली आहेत.खानापूर तालुक्यातील 66 बाधितगावातील 19 हजार 512 शेतकऱ्यांचे 36 हजार 689 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 9125 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 10 हजार 946 शेतकऱ्यांचे 5655.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 3469.36 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 8806 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 10 हजार 706 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.कडेगाव तालुक्यातील 56 बाधितगावातील 1145 शेतकऱ्यांचे 38 हजार 455 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 447 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 5495 शेतकऱ्यांचे 2012.02 हेक्टर क्षेत्राचे यपंचनामे पुर्ण झाली आहेत.वाळवा तालुक्यातील 44 बाधितगावातील 1778 शेतकऱ्यांचे 66 हजार 768 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 729.20 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 3010 शेतकऱ्यांचे 1394.59 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 146 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 1632 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.कवठेमहांकाळ तालुक्यातील 60 बाधितगावातील 16 हजार 425 शेतकऱ्यांचे 24 हजार 157.40 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 10 हजार 990.30 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 13 हजार 304 शेतकऱ्यांचे 8389 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 2601.30 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 8662 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 7763 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.जत तालुक्यातील 72 बाधितगावातील 8940 शेतकऱ्यांचे 65 हजार 815 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4125.50 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 2915 शेतकऱ्यांचे 3456.90 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 668.60 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 15 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 8925 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.शिराळा तालुक्यातील 61 बाधितगावातील 442 शेतकऱ्यांचे 32 हजार 099 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 73.30 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 623 शेतकऱ्यांचे 92.70 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली आहेत.मिरज तालुक्यातील 72 बाधितगावातील 7247 शेतकऱ्यांचे 40 हजार 556 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4998.40 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 6160 शेतकऱ्यांचे 4420.02 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 578.38 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 211 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 7036 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 37725 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 93125 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी