Sangli: चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप, इस्लामपूर न्यायालयाचा जलदगती निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:59 IST2025-05-15T11:57:03+5:302025-05-15T11:59:32+5:30

इस्लामपूर : शिराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्ष वयाच्या  अल्पवयीन चिमुरडीवर लैगिक अत्त्याचार करणाºया जयवंत  उर्फ बाबज्या रामा शिरसट ...

Life imprisonment for abusing a minor girl, Islampur court gives a speedy verdict | Sangli: चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप, इस्लामपूर न्यायालयाचा जलदगती निकाल 

Sangli: चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप, इस्लामपूर न्यायालयाचा जलदगती निकाल 

इस्लामपूर : शिराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्ष वयाच्या  अल्पवयीन चिमुरडीवर लैगिक अत्त्याचार करणाºया जयवंत  उर्फ बाबज्या रामा शिरसट (वय ४६,रा. शिरसटवाडी)याला दोषी धरून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरूध्द थत्ते यांनी जन्मठेप व ४० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने अवघ्या ११ महिन्यात या खटल्याचा निकाल देत नराधम आरोपीला  कारागृहाची वाट दाखविली.दंडाच्या रकमेतील ३५ हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी जयवंत शिरसट याने अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने एका झुडपाजवळ घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्त्याचार केला होता. यावेळी मुलीच्या नात्यातील महिलेने प्रसंगावधान राखत आरोपीवर ओरडल्याने त्याने तेथून पलायन केले. मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर  आरोपी  जयवंत शिरसट याच्याविरूध्द कोकरूड पोलिसात फिर्याद देण्यात आली.त्यावरून शिरसटवर बलात्कार, बाललैंगिक अत्त्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी  या गुन्ह्याचा तपास करीत जयंत शिरसट याच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी न्या.थत्ते यांच्यासमोर झाली. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजीत पाटील याने या खटल्यात  पाच साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी, पंच, साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी, जन्म-मृत्यू निबंधक व तपास अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य मानत न्यायालयाने आरोपी जयवंत शिरसाट याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हवालदार उत्तम शिंदे, बजरंग खराडे यांनी सरकार पक्षाला मदत केली.

महिलेची दक्षता ...

घटनेदिवशी पिडीत मुलगी ही इतर मुलांसोबत खेळत होती. सायंकाळी ७ नंतर ही मुले घरी परतत होती. यावेळी आरोपी शिरसट याने पिडीत मुलीस बाजूच्या झुडपाजवळ घेऊन जात तिच्यावर अत्त्याचार करत होता. याचवेळी एका महिलेचे लक्ष गेल्याने  तिने ओरडताच आरोपीने पलायन केले. या महिलेच्या दक्षतेमुळे  मोठा अनर्थ टळून त्याला जन्माची शिक्षा भोगायची वेळ आली.

आरोपीची खैर नाही ...

गेल्या वर्षीच्या १७ जूनच्या सायंकाळी ही घटना घडली. दुसºया दिवशी आरोपीविरूध्द गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी गतीने तपास करीत आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात  या खटल्याची १२ डिसेंबर २०२४ ला पहिली सुनावणी झाली. २९ मार्चच्या दुसºया सुनावणीत ६ साक्षीदाराचे जबाब घेण्यात आले. आरोपीचे निवेदन आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने या खटल्याचा जलदगतीने निकाल देताना  आरोपीची खैर केली जाणार नाही असाच संदेश दिला.

पिडीत मुलीवर मानसिक आघात...

या खटल्यातील पिडीत मुलीचा जबाब न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घेण्यात आला. यावेळी आरोपीची ओळख पटविण्याकरिता  मुलीला आरोपीचा चेहरा व्ही.सी.व्दारे दाखविण्यात आला. त्याचा चेहरा पाहताच पिडीत मुलगी दचकून बाजूला जावून रडू लागली.या घटनेतून पिडीत मुलीच्या मनामध्ये आरोपीची दहशत किती खोलवर होती, याची देखील न्यायिक नोंद जिल्हा न्यायाधीश थत्ते यांनी घेतली.

Web Title: Life imprisonment for abusing a minor girl, Islampur court gives a speedy verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.