नेर्लेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 11:37 IST2022-04-07T11:36:51+5:302022-04-07T11:37:16+5:30
मृत बिबट्या मादी जातीचा असून सुमारे अडीच ते तीन वर्षाचा आहे.

नेर्लेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
शिराळा: नेर्ले ता. वाळवा येथे पुणे -बेंगलोर महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत कासेगाव पोलिसांनी शिराळा वनविभागास माहिती दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे, वनकर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्या मादी जातीचा असून सुमारे अडीच ते तीन वर्षाचा आहे.
इस्लामपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांच्या उपस्थितीत डॉ. अंबादास माडकर यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर बिबट्याचे दहन करण्यात आले.