Sangli: पाइपमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू, बांबवडेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:18 IST2026-02-20T16:17:35+5:302026-02-20T16:18:25+5:30
नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले

Sangli: पाइपमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू, बांबवडेतील घटना
शिराळा (जि. सांगली) : बांबवडे (ता. शिराळा) येथील शेतकरी चंद्रकांत शंकर माने यांच्या शेतात, पाणी देण्यासाठी टाकलेल्या चार फुटी पाइपमध्ये अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बांबवडे येथील शेतकरी चंद्रकांत माने यांच्या शेतातील मोठ्या पाइपमध्ये वन्यप्राणी अडकल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याची माहिती बांबवडेचे पोलिस पाटील धनंजय माने यांना दिली. पोलिस पाटलांनी वनपाल अनिल वाजे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. वनपाल अनिल वाजे, वनरक्षक स्वाती कोकरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पाइपमध्ये अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढले.
मृत बिबट्याला शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण शिसाळ, डॉ.अनिल पारधी यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. हा बिबट्या 'नर' जातीचा असून त्याचे वय अंदाजे ६ वर्षे होते. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला होता आणि त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.