सांगलीतील पेठ-महादेववाडी रस्त्यावर बिबट्याची दुचाकीवर झडप; महिला व मुलगी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:10 IST2026-01-14T15:49:27+5:302026-01-14T16:10:58+5:30

रेठरे धरण : पेठ ते महादेववाडी या रस्त्यावर मंगळवारी (दि. १३) रात्री सुमारे ९ वाजता शेतातून अचानक बाहेर येत ...

Leopard attacks two-wheeler on Peth-Mahadevwadi road in Sangli; Woman and girl seriously injured | सांगलीतील पेठ-महादेववाडी रस्त्यावर बिबट्याची दुचाकीवर झडप; महिला व मुलगी गंभीर जखमी

सांगलीतील पेठ-महादेववाडी रस्त्यावर बिबट्याची दुचाकीवर झडप; महिला व मुलगी गंभीर जखमी

रेठरे धरण : पेठ ते महादेववाडी या रस्त्यावर मंगळवारी (दि. १३) रात्री सुमारे ९ वाजता शेतातून अचानक बाहेर येत बिबट्याने माणिकवाडी येथील दाम्पत्याच्या दुचाकीवर झडप टाकली आणि हल्ला केला. यामध्ये दुचाकीवरील महिला आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्ल्यानंतर, संबंधित दुचाकीवरील दाम्पत्य माणिकवाडी येथे आल्यावर या घटनेची माहिती मिळाली.

माहितीनुसार, माणिकवाडी (ता. वाळवा) येथील राहुल खाशाबा कुंभार (३७), त्यांची पत्नी कोमल आणि सात वर्षांची मुलगी शर्वरी हे तिघेजण पेठकडून महादेववाडी ते माणिकवाडीकडे दुचाकीवरून प्रवास करत होते. जेव्हा ते महादेववाडी रस्त्यावर आले, तेव्हा अचानक अंधारातून बाहेर येत बिबट्याने गाडीवर झडप टाकली आणि कोमल यांच्या पायावर पंजा मारून त्यांना गंभीर जखमी केले. बिबट्याच्या पंजाने त्यांच्या मुलीच्या पायावरही ओरखडा आला आहे. 

हल्ल्यानंतर घाबरलेल्या राहुल कुंभार यांनी तिघांना दुचाकीसह माणिकवाडी येथे आणले आणि गावातील लोकांना याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर कुंभार दाम्पत्य खूप घाबरले होते. पुढील उपचारासाठी त्यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वनपाल दादासाहेब बर्गे, वनरक्षक भिवा कोळेकर आणि रेस्क्यू टीमचे प्रमुख युनूस मणेर यांनी जखमींना इस्लामपूर येथे दाखल केले.

Web Title : सांगली में तेंदुए का बाइक पर हमला, महिला, बच्ची घायल।

Web Summary : सांगली के पास एक तेंदुए ने मोटरसाइकिल पर सवार एक दंपति और उनकी बेटी पर हमला कर दिया। महिला और बच्ची गंभीर रूप से घायल हो गईं और उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया। यह घटना पेठ-महादेववाड़ी मार्ग पर रात में हुई, जिससे गांव में दहशत फैल गई।

Web Title : Leopard attacks bike on Sangli road, injures woman, child.

Web Summary : A leopard attacked a couple and their daughter on a motorcycle near Sangli. The woman and child were seriously injured and hospitalized. The incident occurred at night on Peth-Mahadevwadi road, creating panic in the village.