शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कणदूर येथे भरदिवसा शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये घबराट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:49 IST

आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. 

सहदेव खोतपुनवत: कणदूर ता. शिराळा येथे शेतकरी जगन्नाथ बाळू गुंडणके (वय ६०) यांच्यावर शेतात पाणी पाजत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्यामध्ये त्यांच्या हाताला खोलवर जखमा झाल्या असून शिराळा येथे  उपजिल्हा रुग्णालयात  प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कणदूर गंगानगर येथील शेतकरी जगन्नाथ बाळू गुंडणके हे आपल्या वारणा कालव्याजवळ माळ नावाच्या शेतात हत्ती गवताला पाणी देण्यासाठी दुपारी गेले होते. शेतात काम करत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. यात जगन्नाथ गुंडणके यांच्या हाताला खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. यावेळी गणेश गुंडणके, अजित गुंडणके व स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने गावात आणून पुढील उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात हलवले. यावेळी शिराळा नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक, रणधीर नाईक माजी सरपंच रघुनाथ पाटील यांनी भेट देऊन जखमीची विचारपूस केली. गुंडणके यांच्या जखमा खोलवर असल्याने व रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.याघटनेमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. या बिबट्याचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करून शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. दरम्यान, उप वनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे  तसेच वनरक्षक दत्तात्रय शिंदे, रजनीकांत दरेकर,सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड, संतोष कदम,संकेत गायकवाड, हर्षद जाधव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्यावर योग्य ते उपचार तातडीने करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहेत. तसेच वन विभागाने येथे पिंजरा लावला असून जखमीला उपचारासाठी तातडीची मदत मिळवून देऊ. -  सत्यजित देशमुख, आमदार

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attacks farmer in Sangli; panic spreads among farmers.

Web Summary : In Sangli's Kandur, a leopard attacked farmer Jagannath Gundanke while he was irrigating his field. Seriously injured, he was moved to Kolhapur for treatment. The forest department has set up a cage to catch the leopard following the incident.