सांगली : जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेचा चेंडू आता जिल्ह्याच्या सीमेपार गेला आहे. चर्चेचे केंद्र आता मुंबईत गेले असून वरिष्ठांच्या आदेशानुसारच निर्णय घेतला येईल अशी भूमिका जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली आहे.महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी बहुमतासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार) चर्चा सुरू ठेवली आहे. गुरुवारपर्यंत चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादीनंतर आता शिंदेसेनाही पुढे सरसावली आहे. पक्षाने पाठिंब्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आता युती आणि आघाडीच्या नेत्यांना शिंदेसेनेच्याही मागे धावावे लागत आहे.गेले चार दिवस जिल्हास्तरावर बैठका, वाटाघाटी आणि चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर आता अंतिम निर्णयाचा चेंडू मुंबईला टोलविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट ठेवली आहे. तसा ठराव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सादर केला आहे.
वाचा: राष्ट्रवादी, शिंदेसेनेला गृहित धरून आघाडी, युतीची गणिते; आम्ही स्वतंत्र असल्याचा अजित पवार गटाचा पवित्रादरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्यांची महत्त्वाची बैठक रविवारी मुंबईत सांगलीत होणार आहे. या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही पक्षांकडून सत्तेच्या तोडग्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम, अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची वाटणी, तसेच कोणत्या पक्षाचा पाठिंबा कसा मिळवायचा यावर चर्चा झाली. मुंबईतील बैठकीत सत्तेचा प्रस्ताव कसा ठेवायचा, कोणत्या पक्षांना सोबत घ्यायचे याबाबत निर्णयाची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या संभाव्य नावांवरही यावेळी चर्चेची शक्यता आहे.पालकमंत्री-निशिकांत पाटील यांची भेटराष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुरुवारी भेट झाली. यावेळी पाठिंब्यासंदर्भात प्राथमिक बोलणी झाल्याचे समजते. अध्यक्षपद दिल्यास पाठिंबा देऊ, अशी भूमिका निशिकांत पाटील यांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात पालकमंत्री सोमवारी पक्षाच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. यानिमित्ताने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे.पहिले वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादीला?पहिले वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटास द्या, आम्ही पाठिंबा देऊ असा प्रस्ताव माजी खासदार संजय पाटील यांनी आमदार जयंत पाटील, डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे दिल्याचे समजते. यासंदर्भात रविवारी बैठक होणार आहे. त्यावेळी या प्रस्तावावर चर्चा आणि निर्णयाची शक्यता आहे.
Web Summary : Sangli ZP's power struggle shifts to Mumbai as leaders negotiate alliances. NCP demands the president post. Congress, NCP, and BJP explore possibilities, with discussions focusing on power-sharing and support strategies. A crucial meeting is scheduled in Mumbai to finalize decisions.
Web Summary : सांगली ZP का सत्ता संघर्ष मुंबई पहुंचा, नेता गठबंधन पर बात करेंगे। NCP अध्यक्ष पद चाहती है। कांग्रेस, NCP और BJP संभावनाएं तलाश रहे हैं, सत्ता-साझेदारी और समर्थन रणनीतियों पर चर्चा होगी। अंतिम निर्णय के लिए मुंबई में बैठक तय है।