शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा’च्या संचालकांना शेवटची संधी

By admin | Updated: November 9, 2016 00:52 IST

‘बॅँक घोटाळा : २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी; आदेशानंतर कागदपत्रे ताब्यात

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी माजी संचालक व अधिकाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याची शेवटची संधी दिली आहे. उपलब्ध कागदपत्रे ताब्यात घेऊन म्हणणे सादर न केल्यास संबंधितांचे काही म्हणणे नसल्याचे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाईल, असे रैनाक यांनी स्पष्ट केले आहे. माजी संचालक व अधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार जवळपास ११ हजार कागदपत्रे त्यांनी उपलब्ध करून दिली होती. तरीही बहुतांश संचालकांनी पैसे भरून कागदपत्रे ताब्यात घेतली नाहीत. मंगळवारी सुनावणीवेळी माजी संचालकांनी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करीत म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. रैनाक यांनी उपलब्ध कागदपत्रे ताब्यात घेण्याची सूचना दिली. २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी जे संचालक म्हणणे सादर करणार नाहीत, त्यांना याप्रकरणी काहीही म्हणायचे नाही, असे समजून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशानंतर दिवसभरात तीन माजी संचालकांनी पैसे भरून कागदपत्रे ताब्यात घेतली. अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रावरील सुनावणीचे कामकाज सुरू असून, सुनावणीच्या सहा तारखा झाल्या आहेत. दरम्यान, माजी संचालकांनी याप्रकरणी सहकार मंत्र्यांकडे अपील दाखल केले आहे. सहकार विभागाकडून याप्रकरणी सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही. तरीही अपिलाची एक प्रत सहकार विभागाकडून चौकशी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे. सहकार मंत्र्यांकडील अपिलावर होणाऱ्या सुनावणीकडे माजी संचालकांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी सहकार मंत्र्यांकडूनही दाद न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचीही तयारी माजी संचालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)