शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

बिऊर येथील घरातून भरदुपारी ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 1:24 PM

Crimenews Sangli- बिऊर (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानी भर दुपारी ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

ठळक मुद्देबिऊर येथील घरातून ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण

शिराळा  :  बिऊर (ता. शिराळा) येथील शेतकरी प्रकाश शिवाजी पाटील यांच्या घरातून अज्ञात चोरट्यानी भर दुपारी ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश पाटील हे आपल्या लहान मुलाला घेऊन पत्नीसह शिराळा येथे दवाखान्यात गेले होते. घरात कोणी नाही हे पाहून दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी प्रकाश पाटील यांच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साडे तीन तोळ्याचे मंगळसूत्र , अंगठी , कर्णफुले , लहान मुलांचे दागिने असे ६ तोळे सोन्याचे दागिने , किरकोळ चांदीचे दागिने व रोख रक्कम १५ हजार असा जवळपास ३ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.या चोरीत मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व  हा मुख्य दरवाजाला आतून कडी लावून  कपाटाचे दार उचकटून त्यातील डब्यात ठेवलेले दागिने व जवळच असलेले १५ हजार रुपये रोख रक्कम चोरून घराच्या मागील बाजूचा दरवाजाने पलायन केले. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण केले होते.हे श्वानपथक घराभोवतीच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनी कपाटावरील ठसे घेतले आहेत.

घटनास्थळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भेट दिली. यावेळी सरपंच सुखदेव पाटील, धनाजी पाटील, पोलिस पाटील, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत प्रकाश पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून हवालदार डी. जी. कुंभार हे तपास करीत आहेत.

पँटमध्ये ठेवलेली रोख रक्कम वाचली दि.२ एप्रिल रोजी मध्यवर्ती बँकेतून हे दागिने सोडवून आणले होते व दोन दिवस बँकांना सुट्टी असलेने कपाटात ठेवले होते. येथेच अडकवलेल्या पँट मध्ये रोख वीस हजार रुपये होते मात्र चोरट्याला ते मिळाले नाही त्यामुळे ही रक्कम वाचली.

ही दुसरी चोरी

शिराळा येथे दि.२६ मार्च रोजी सुधिर जाधव यांच्या घरातून २२ तोळे सोने व ५० हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला होता त्या चोरट्यांचा अद्याप शोध लागला नाही तोपर्यंत आज ही दुसरी चोरी झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसshirala-acशिराळाSangliसांगली