शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाहती कृष्णा नदी कोरडी; सांगलीकरांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा निषेध 

By अशोक डोंबाळे | Updated: January 27, 2024 17:05 IST

कुणाला खुश करण्यासाठी धरणातील पाणी रोखता, आंदोलकांचा सवाल

सांगली : कृष्णा नदी अखंडित वाहणारी नदी असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नदी कोरडी पडत आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी कोयना धरणाचे अधिकारी सांगलीचेपाणी रोखत आहेत, असा आरोपही संतप्त आंदोलकांनी केला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे सांगलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, असाही आरोप आंदोलकांनी केला.मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीनवेळा कृष्णा नदी कोरडी पडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नागरिक जागृती मंच आणि कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागिरकांनी कृष्णा नदीवरील सांगलीतील बंधाऱ्यावर शनिवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जलसंपदा विभाग आणि लोकप्रतिनिधीच्या जोरदार घोषणा दिल्या. जलसंपदा विभागाने जिल्ह्याचे हक्काचे पाणी कृष्णेत सोडून ती बारमाही वाहती ठेवावी, अशी मागणी केली. कृष्णा नदी कोरडी पडायचे कोणतेही कारण नाही.

मात्र, राज्याचा जलसंपदा आणि सांगली जलसंपदा विभाग जिल्ह्यावर अन्याय करीत आहे. कोणाला तरी खुश करण्यासाठी धरणातून पाणी सोडले जात नाही. सांगलीच्या हक्काचे पाणी अडवून ठेवून अन्याय करत आहेत. यापुढे सांगलीतील आणि जिल्ह्यातील नागरिक हा अन्याय सहन करणार नाहीत. जर पुन्हा नदी कोरडी पाडण्याचा खेळ झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाच्या परिणामांची जबाबदारी ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला.नागरिक जागृती मंच जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण, डॉ. रवींद्र व्होरा, मनोज पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, माजी नगरसेवक हनमंतराव पवार, तानाजी सरगर, मोहन चोरमुले, संजय चव्हाण, अजितकुमार पाटील, अविनाश जाधव, उदय पाटील, जयराज बर्गे, गोपाळ मर्दा, अविनाश जाधव, अशोक माने, सतीश दुधाळ, गजानन साळुंखे, अण्णासाहेब शिंदे, संजय वाईंगडे, शीतल वानखंडे, डॉ. अशोक चव्हाण आदी आंदोलनात सहभागी होते.

सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ३४ टीएमसी पाणीकोयना धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा ७१ टीएमसी असून विद्युत निर्मितीसाठी ४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यापैकी कृष्णा नदीसाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धोम, उरमोडी, तारळी धरणात १२ टीएमसी पाणी आहे. असे एकूण हक्काचे ३४ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याच्या हक्काचे उपलब्ध आहे. ते पूर्णपणे सोडल्यास येथून पुढे जून अखेरपर्यंत कृष्णा अखंडित वाहती राहू शकते, तरीही कृष्णा नदी कोरडी का पाडली जात आहे, असा संतप्त सवाल सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी उपस्थित केला.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी