शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; कृष्णेची पातळी ३५ फुटांवर जाणार, जलसंपदा विभागाकडून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 13:01 IST

सांगली : वारणा (चांदोली) आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. कोयनेतून शुक्रवारी १० हजार १०० क्युसेकने, तर ...

सांगली : वारणा (चांदोली) आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. कोयनेतून शुक्रवारी १० हजार १०० क्युसेकने, तर वारणेतून नऊ हजार ३७१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा-वारणेच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी सांगलीत आयर्विनची पातळी ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली. कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आल्याचे चित्र होते.धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासांत १४८ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात ३१.५४ टीएमसी पाणीसाठा असून, ९२ टक्के धरण भरले. धरणातून नऊ हजार ३७१ क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. कोयना धरण क्षेत्रात २०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात ८८.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ८५ टक्के भरल्याने १० हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र शुक्रवारी शिराळा तालुका वगळता उर्वरित तालुक्यात पावसाने उसंत घेतली. शिराळा, वाळवा तालुक्यांतील काही भागात रिमझिम पाऊस झाला.

एनडीआरएफची दोन पथके दाखल

जिल्ह्यात दोन एनडीआरएफ पथके दाखल झालेली आहेत. अद्याप जिल्ह्यामध्ये कोणतीही पूर परिस्थिती नाही. तथापी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने ही पथके उपलब्ध ठेवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. एनडीआरएफ, पुणेचे सहायक कमांडंट सारंग कुर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक आष्टा (मनोजकुमार शर्मा पथकप्रमुख) व एक पथक सांगलीमध्ये (रघुवंश, पथकप्रमुख) ठेवण्यात येणार आहे. या पथकामध्ये प्रत्येकी २२ जवान व प्रत्येकी चार बोटी उपलब्ध आहेत.

शिराळ्यात २७ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक २७.४ मि.मी. पाऊस झाला. मिरज ४.५, जत ०.५, खानापूर ६.०, वाळवा ११.६, तासगाव ५.७, शिराळा २७.४, आटपाडी ०.५, कवठेमहांकाळ २.६, पलूस ७, कडेगाव ७.१ मिलिमीटर आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका : ज्योती देवकर

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी वाढत राहणार आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी शुक्रवारी ३५ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे. आरळा-शित्तूर, काखे-मांगले पूल पाण्याखाली गेला. याशिवाय दोन्ही नद्यांवरील १३ बंधारे पाण्याखाली गेलेले कायम आहेत.

अलमट्टीतून सव्वादोन लाख क्युसेकने विसर्ग

अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मंगळवारी धरणात १०७.७२ टीएमसी पाणीसाठा होता. धरणात एक लाख ५५ हजार ४७ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच दोन लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू करून दहा टीएमसीने पाणीसाठा कमी करून सध्या १०७.७२ टीएमसी ठेवला आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढविण्याची अलमट्टी जलसंपदा प्रशासनाने तयारी ठेवली आहे.कृष्णा पूल कराड १८.१०बहे १०.६ताकारी ३२भिलवडी पूल ३१.५आयर्विन ३०अंकली ३७.३म्हैसाळ ४३राजापूर बंधारा ४४धरणातील पाणीसाठाधरण     क्षमता    सध्याचा पाणीसाठा   टक्केवारीअलमट्टी  १२३       १०७.७२            ९३.८८कोयना    १०५.२३  ८८.९७              ८५वारणा    ३४.२०     ३१.५४              ९२

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरणWaterपाणीfloodपूर