शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेल, धान्य कोट्यासाठी शिराळ्यात मोचा

By admin | Updated: February 4, 2015 00:03 IST

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन : केशरी शिधापत्रिका धारकांच्या मागण्या पूर्ण कर्रा

शिराळा : केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य कोटा त्वरित सुरू करावा व रॉकेल कोटा पूर्ववत सुरू करण्याची मागणी घेऊन तालुका राष्ट्रवादी, युवक राष्ट्रवादी व विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तिन्ही संघटनांचे अनुक्रमे विजयराव नलवडे, सम्राटसिंंह नाईक व सागर नलवडे यांनी याचे नेतृत्व केले. माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा बसस्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली. तिन्ही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा मोर्च्यात सहभाग होता. तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे म्हणाले की, केशरी शिधापत्रिका धारकांना आघाडी शासनाच्या काळात धान्य पुरवठा केला जात होता. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्रति किलो २ रुपये दराने गहू व ३ रुपयांनी तांदूळ दिला जात होता. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेना सरकारने या महत्त्वाकांक्षी योजना बंद केल्या आहेत. खेडेगावात स्वयंपाकासाठी चूल व स्टोव्हचा वापर केला जातो. भारनियमनामुळे कंदील, दिवे लावावे लागतात. नवीन सरकारने रॉकेलचा कोटा कमी केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पूर्वीप्रमाणेच रॉकेलचा कोटा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी विजयसिंंह देशमुख व तहसीलदार विजया जाधव यांना देण्यात आले. निवेदनातील मागण्या शासनापर्यंत कळविल्या जातील, असे आश्वासन प्रांताधिकारी व तहसीलदारांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी ‘विश्वास’चे संचालक भीमराव गायकवाड, विश्वास कदम, माजी सभापती अ‍ॅड. भगतसिंंग नाईक, संचालक रणजितसिंंह नाईक, अभिजित नाईक, विराज नाईक, विश्वप्रताप नाईक, पंचायत समिती सदस्य लालासाहेब तांबीट, सरपंच गजानन सोनटे, उपसरपंच संभाजी गायकवाड, माजी सरपंच देवेंद्र पाटील, दिलीप घाटगे, ग्रामपंचायत सदस्य एम. आर. कुरणे, दस्तगीर आत्तार, संजय हिरवडेकर, बाबा कदम, सुनील कवठेकर, अशोक यादव, संतोष पांगे, मंगेश कांबळे, बसवेश्वर शेटे उपस्थित होते. (वार्ताहर)