शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांचा ‘बाबां’ना धोबीपछाड!

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

‘होम टू होम’ प्रचारावर भर

प्रताप महाडिक- कडेगाव -पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार व ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी विरोधकांचे चक्रव्यूह भेदत, विरोध मोडून काढत पलूस-कडेगावच्या मैदानातील जंगी कुस्ती मारली. त्यांनी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर २४ हजार ३४ मतांनी मात करीत विजयी चौकार मारला.पलूस-कडेगाव मतदारसंघावर गेली १५ वर्षे डॉ. पतंगराव कदम यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. परंतु यावेळी डॉ. कदम यांची घोडदौड रोखण्यासाठी पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपकडून उमेदवारी करीत जोरदार फिल्डिंग लावली होती. डॉ. पतंगराव कदम विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करीत होते, तर पृथ्वीराज देशमुख, कदमविरोधकांना एकसंध करीत पाणीप्रश्न, विकास कामांतील उणिवा प्रकर्षाने दाखवीत होते. निवडणूक प्रचार काळात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फै री झडत होत्या. डॉ. पतंगराव कदम यांना शह देण्याची सर्वतोपरी तयारी पृथ्वीराज देशमुख यांनी केली होती. कऱ्हाड-विटा रस्त्याच्या उत्तरेकडील भागावर पृथ्वीराज देशमुख यांना मताधिक्य मिळण्याचे संकेत होते. परंतु येथेही डॉ. पतंगराव कदम यांनी अटीतटीची झुंज दिली. काँग्रेसचा बालेकिल्ला, सोनहिरा खोराही कदम यांनी अबाधित राखला आणि पलूस तालुक्यातही चांगले यश कदम यांनी मिळविले.पतंगरावांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच्या कालखंडात विकास कामांची माहिती दर्शविणारे डिजिटल गावोगावी लावले होते. याशिवाय नवीन मंजूर कामांचे भूमिपूजन समारंभही केले होते. यामुळे गावोगावी काँग्रेस कार्यकर्ते रिचार्ज झाले होते. आचारसंहिता लागू होताच पतंगरावांनी गावोगावी भेटी देऊन तेथील काँग्रेसअंतर्गत गटबाजी मोडून काढली. दरम्यान, पृथ्वीराज देशमुख भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. भाजपचे तिकीट मिळाल्यावर पृथ्वीराज देशमुख यांनी प्रचारयंत्रणा वेगात सुरू केली. यावेळी मतदारसंघात अटीतटीची लढत होईल, असे वातावरण होते. उमेदवारी अर्ज माघारीनंतर पलूस-कडेगावमध्ये प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या. काँग्रेसचे पतंगराव कदम व भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रचारसभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. मोदी लाटेचा फायदा पृथ्वीराज देशमुख यांना होईल, असे वातावरण होते, तर मतविभागणीचा फायदा पतंगराव कदम यांना होईल, असे चित्र होते. देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. याला पतंगरावांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अभिनेता रितेश देशमुख यांना बोलावून प्रतिउत्तर दिले. मालनताई मोहिते, भीमराव मोहिते, दीपक भोसले, इंद्रजित साळुंखे, सत्यजित यादव-देशमुख, बाळकृष्ण यादव, सुरेश मोहिते, जे. के. जाधव, महेंद्र लाड, ए. डी. पाटील, श्रीकांत लाड, हेमंत पाटील आदी कित्येक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांत पतंगरावांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. नियोजनबद्ध व घरोघरी पोहोचून गावोगावच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. विरोधकांनी गावोगावी जोरदार फिल्डिंग लावली होती. परंतु डॉ. कदम यांनी नाराजांना भेटून विरोध मोडून काढण्यात चांगलेच यश मिळविले आणि चौथा विजय संपादन केला. ‘होम टू होम’ प्रचारावर भरपतंगराव कदम यांनी सावध पावले उचलत काँग्रेस कार्यकर्ते एकसंध केले. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, शांताराम कदम, युवा नेते जितेश कदम, सौ. वैशालीताई कदम यांच्यासह कदम कुटुंबियांनी होम टू होम प्रचारावर भर दिला.भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, युवा नेते संग्रामसिंह देशमुख, क्रांतीचे अध्यक्ष अरुण लाड, लालासाहेब यादव, भारत पाटील आदींनी देशमुख यांच्या प्रचारसभा गाजविल्या व गावोगावी प्रचारयंत्रणाही राबविली.