शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

कवठेमहांकाळच्या पटलावर विधानसभेसाठी ज्योतिताईची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 4:40 PM

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी ज्योतिताई संजयकाका पाटील यांनी तयारी चालविली असून, एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी एंट्री केली आहे. खासदार गटाचे प्रमुख कार्यकर्तेही या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यामुळे अजितराव घोरपडे गटात चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देकवठेमहांकाळच्या पटलावर विधानसभेसाठी ज्योतिताईची एन्ट्रीअजितराव घोरपडे गटात चिंतेचे वातावरण

कवठेमहांकाळ : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेसाठी ज्योतिताई संजयकाका पाटील यांनी तयारी चालविली असून, एका पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून कवठेमहांकाळ तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी एंट्री केली आहे. खासदार गटाचे प्रमुख कार्यकर्तेही या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यामुळे अजितराव घोरपडे गटात चिंतेचे वातावरण आहे.विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एकसंध असणाऱ्या भाजपमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून संशयकल्लोळ आहे.

माजी मंत्री अजितराव घोरपडे व खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कवठेमहांकाळ शहरात विकास सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घोरपडे गटाने घेतला. यावेळी घोरपडे गटाने पालकमंत्री सुभाष देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.विधानसभेची भाजपची उमेदवारी घोरपडे यांनाच मिळाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पालकमंत्री देशमुख यांनीही सावध भूमिका घेत, आपण पोस्टमन असल्याचे सांगत, पक्षाकडे भावना पोहोचवू, असे सांगून वेळ मारून नेली.यातच खासदार पाटील यांच्या गटाच्या चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब पाटील, दादासाहेब कोळेकर, व्यंकटराव पाटील, हायूम सावनूरकर, अनिल शिंदे, सविता माने, महादेव सूर्यवंशी, दिलीप पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी कृष्णा पतसंस्थेच्या उद्घाटनाचे निमित्त साधून कार्यक्रम घेतला. खासदार गटानेही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने ज्योतिताई पाटील यांनीही विधानसभेच्या तयारीत असल्याचे उघड केले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ज्योतिताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी खासदार गटाच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे गटाला जणू इशाराच दिला आहे.अगदी महिन्याभरापर्यंत तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी अजितराव घोरपडे यांना पक्की समजली जात होती. नेत्यांनी त्याबाबत त्यांना शब्द दिल्याचीही चर्चा होती, परंतु ज्योतिताई पाटील यांच्या कवठेमहांकाळमधील ह्यएंट्रीह्णने चुरस निर्माण झाली आहे. तालुक्यात आता विधानसभेच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतसगाव कवठे महाकळ