शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:28 IST

जयश्रीताई अन् त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ

सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. भाजपबरोबर जाणे म्हणजे अनैसर्गिक युती ठरणार असल्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले.विशाल पाटील म्हणाले, दिवंगत नेते मदन पाटील यांनीही १९९९ मध्ये राष्ट्रवादी आणि दिवंगत नेते संभाजी पवार यांच्याशी युती केली होती; पण, सांगलीकरांनी या युतीला झिडकारले होते. या निवडणुकीत मदनभाऊ यांचा पराभव झाला होता. म्हणून जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये. सांगलीकरांना हा निर्णय रुचणार नाही. म्हणून जयश्रीताई यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय रद्द करण्याची गरज आहे. अजूनही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.जयश्रीताई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी मी आणि काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम चर्चा करणार आहे. काँग्रेस पक्षाने कारवाई केली असली तरी त्यावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून तोडगा काढता येतो.

भाजपकडून प्रस्ताव म्हणजे कामाची दखलखासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यांचा हा प्रस्ताव म्हणजे माझ्या कामाची दखल घेतली आहे. याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे मी आभार मानतो, असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.

जयश्रीताईंचा निर्णय काँग्रेससाठी धक्कादायक : विश्वजित कदमजिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. मी जयश्रीताई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. २०२४च्या विधानसभा निवडणुकीपासून त्या काँग्रेसपासून दूर होत्या. अपक्ष लढल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली होती. या सर्व घडामोडीमुळे त्या नाराज होत्या. जयश्रीताई यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी आमची मागणी आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.