शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
भारतीय नौदल चीन, पाकिसातन, तुर्की अन् चीनला धक्का देणार! तीन पावले उचलली
4
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
5
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
6
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
7
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
8
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
9
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
10
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
11
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
12
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
13
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
14
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
15
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
16
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
17
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
18
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
19
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
20
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक

जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?

By संतोष कनमुसे | Updated: October 24, 2025 12:55 IST

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव अचानक अज्ञातांनी बदलले आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कमानीवरील नाव अचानक रात्रीत बदलले. काही अज्ञातांकडून कारखान्याच्या कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे नवीन नाव लिहिले आहे. या कारखान्यावरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. आता स्वागत कमानीवरील नाव अचानक बदलल्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे. 

Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी पडळकर यांनी जत येथील साखर कारखाना सभासदांना परत करण्याची मागणी केली होती. त्यांनी कारखाना चालू होऊ देणार नसल्याचा इशाराही दिला होता. तर दुसरीकडे, आता अज्ञातांनी रात्रीत कारखान्याच्या कमानीवरील नाव बदलल्याने नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, या कमानीवर आधी राजारामबापू पाटील साखर कारखाना असे नाव होते. या कमानीवरील हे नाव काढून आता राजे विजयसिंह डफळे कारखाना असे लिहिले आहे.  राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते ( १९२८-१९४८) आणि त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली आहे. यात प्रामुख्याने राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा ही समावेश होता. राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभा केला होता.

राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बदलल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jayant Patil's factory name changed; Padalkar-Patil feud to escalate?

Web Summary : Unknown individuals changed Rajarambapu Patil factory's name to Raje Vijay Singh Dafle. This act reignites the feud between Jayant Patil and Gopichand Padalkar, escalating tensions in Jat, Sangli.
टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSangliसांगलीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस