शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

जयंत पाटील यांच्या भूमिकेने सर्वपक्षीय नेते अस्वस्थ, विरोधक धास्तावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:14 IST

जानेवारीत निर्णयाची शक्यता

अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिकेवर इस्लामपूर मतदारसंघातील सर्वच पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. पाटील यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी सध्यातरी आपले देव पाण्यात घातलेले आहेत. शहरातील एका कार्यक्रमात सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. पाटील यांनी महायुतीत प्रवेश केल्यास आपले भवितव्य काय ? असा अस्वस्थ करणारा प्रश्न भाजप, राष्ट्रवादी व शिंदेसेनेतील स्थानिक नेत्यांना पडला आहे. परंतु, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेने समर्थक मात्र मौन बाळगून आहेत.सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. यावर राजकीय वर्तुळात विविध पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषत: सांगली जिल्ह्याचे मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठीच राखून ठेवल्याचे मतदारसंघातून चर्चेले जात आहे. परंतु, भाजप किंवा राष्ट्रवादी (अजित पवार) यापैकी एका पक्षात जयंत पाटील प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त होतोय. मात्र, पाटील यांच्या मौनाच्या भूमिकेमुळे इस्लामपूर मतदारसंघातील त्यांचे विरोधक अस्वस्थ झाले आहेत.

जयंत पाटील समर्थकांचे मौन..माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या घरगुती कार्यक्रमात सर्वच पक्षातील नेते एकत्र आले होते. यामध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांनी मौन पाळले, तरी आमच्यापेक्षा विरोधी पक्षातील नेत्यांना पाटील यांच्या संदिग्ध भूमिकेची काळजी लागून राहिली आहे. पाटील हे महायुतीत सामील झाल्यास आमच्या राजकीय भवितव्याचे काय होणार, असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.जानेवारीत निर्णयाची शक्यतासध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे. आ. जयंत पाटीलही अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या चर्चा असल्या तरी जानेवारी महिन्यात आ. पाटील योग्य निर्णय घेतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

भाजप हा देश पातळीवरील पक्ष आहे. १९९५ पासून आम्ही भाजपमध्ये कार्यरत आहे. भाजप सर्वसमावेशक पक्ष असल्याने हिंदुत्व मानावयास जे तयार आहेत, असे सर्वच लोक भारतीय जनता पार्टीत येतात. त्यामुळे भाजपमध्ये कोणीही प्रवेश केला तरी कार्यकर्ते अस्वस्थ होत नाहीत. - सी. बी. पाटील, माजी राष्ट्र कार्यकारिणी सदस्य 

आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत मतदारसंघात राहण्याचे काम करू. जयंत पाटील यांच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय होईल, त्याचे पालन करू. - केदार पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार