शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

..अखेर साडू-साडू विधानसभेत पोहोचले, राजकीय वैर सांभाळत तीन अपयशानंतर सत्यजित देशमुख विजयी झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 17:32 IST

विकास शहा  शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय पटलावर कायम वजन राहिले आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या घडामोडी घडून राज्याची ...

विकास शहा शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघाचे राजकीय पटलावर कायम वजन राहिले आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या घडामोडी घडून राज्याची सत्ता ही बदलण्यात येथील राजकीय ताकदीचा उपयोग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची कधी साथ कधी कडवा विरोध यास तोंड देत तीन अपयश पचवत अखेर त्यांचे साडू सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवत आमदारकी मिळवली.यामुळे हे दोन साडू साडू आता विधानसभेत पोहोचले आहेत.माजी आमदार दिवंगत मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांच्या दोन कन्या पैकी शैलजा या जयंतराव यांच्या तर रेणुकादेवी या सत्यजित यांच्या पत्नी आहेत. १९९५ मध्ये राजकीय घडामोडी घडल्या यामध्ये दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी न देता शंकरराव चरापले यांना उमेदवारी दिली. यामुळे संपूर्ण राजकारण फिरले आणि देशमुख यांच्या कडे असणारी १९७८ पासून आमदारकी नाईक घरात गेली.१९९९ मध्ये सत्यजित यांना काँग्रेस ची उमेदवारी मिळाली मात्र त्यावेळी अपयश आले.२००४ ला अपक्ष व २०१४ ला काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.या तीनही निवडणुकीत अपयश आले.यानंतर त्यांनी काँग्रेस ला रामराम ठोकला आणि भाजप मध्ये प्रवेश केला. या अगोदरच शिवाजीराव नाईक यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.सत्यजित यांनी भाजप प्रवेश केला आणि शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक गट एकत्र आले. याचबरोबर या मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस जवळजवळ हद्दपार झाली.२०१९ मध्ये सत्यजित यांनी भाजपला साथ दिली मात्र यावेळी शिवाजीराव नाईक यांना अपयश आले. दोनवेळा वसंतराव नाईक म्हणजे नाईक घराण्याकडे असणारी आमदारकी १९७८ पासून १९९५ पर्यंत देशमुख त्यानंतर १९९५ पासून २०२४ पर्यंत नाईक घराण्याकडे आमदारकी राहिली.यावेळी पुन्हा देशमुख घराण्याकडे ही आमदारकी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंतराव तर भाजपचे सत्यजित हे साडू साडू विधानसभेत पोहोचले आहेत.भाजप प्रवेश अन् आमदारकी

  • सत्यजित यांनी १९९९ , २००४ , २०१४ मधील दोनवेळा काँग्रेस व एकवेळा अपक्ष निवडणूक लढवली मात्र यामध्ये त्यांना अपयश आले.
  • शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर सत्यजित यांची काँग्रेस मध्ये होणारी घुसमट यामुळे भाजप प्रवेश केला.अखेर भाजप प्रवेश त्यांना आमदारकी मिळवून दिला.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरshirala-acशिराळाJayant Patilजयंत पाटीलSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024