मंत्री जयंत पाटलांकडून लसीचे 2 डोस घेणाऱ्या 108 वर्षीय आजीचा साडी चोळीनं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 16:43 IST2021-06-07T16:19:48+5:302021-06-07T16:43:44+5:30

मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने 'लवकर आलास...' अशी हाक देत मायेनं विचारपूसही केली.

Jayant Patel honors 108-year-old Zarina grandma with a sari in sangli | मंत्री जयंत पाटलांकडून लसीचे 2 डोस घेणाऱ्या 108 वर्षीय आजीचा साडी चोळीनं सन्मान

मंत्री जयंत पाटलांकडून लसीचे 2 डोस घेणाऱ्या 108 वर्षीय आजीचा साडी चोळीनं सन्मान

ठळक मुद्देमंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने 'लवकर आलास...' अशी हाक देत मायेनं विचारपूसही केली.

सांगली - कोरोनाने भल्याभल्यांना घाम फोडला, मात्र इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना आजीने कोरोनाला आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. याउलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने जीवनाशी लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल १०८ वर्षीय जरीना आजीचा साडीचोळी देऊन सत्कारही केला.

मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने 'लवकर आलास...' अशी हाक देत मायेनं विचारपूसही केली. इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे दाखवून दिलं. त्यामुळे लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

Web Title: Jayant Patel honors 108-year-old Zarina grandma with a sari in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.