शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

जतला लिपिकासह दोघे लाचखोर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2015 23:33 IST

चार हजार घेतले : तहसील कार्यालयात सापळा

सांगली : शेतजमिनीची खरेदी दस्ताप्रमाणे नोंद घालून त्याचा उतारा देण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या जत तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व त्याचा खासगी मदतनीस या दोघांना रंगेहात पकडले. अनुक्रमे सिद्धू आप्पा शिंदे (वय ४६, रा. जालिहाळखुर्द, ता. जत) व कृष्णदेव रामू बाबर (४५, जनावर बाजाराजवळ, जत) अशी त्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी पावणेबारा वाजता ही कारवाई केली. वाळेखिंडी (ता. जत) येथील तक्रारदारास शेतजमिनीची खरेदी दस्ताप्रमाणे नोंद घालून त्याचा सातबारा उतारा पाहिजे होता. यासाठी त्यांनी जत तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सिद्धू शिंदे याची भेट घेतली. शिंदे याने उतारा देण्यासाठी त्याचा खासगी मदतनीस बाबर याच्यामार्फत पाच हजार लाचेची मागणी केली. पैसे दिले तरच उतारा देणार, असे त्याने सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. तसेच त्यांनी लावलेल्या सापळ्याप्रमाणे तक्रारदाराने शिंदे व बाबर यांची पुन्हा भेट घेतली. पाच हजार जास्त होतात, जरा कमी करा, असे सांगितले. त्यावर या दोघांनी चर्चेअंती चार हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदाराने लाचेची रक्कम शनिवारी दुपारी घेऊन येतो, असे सांगितले होते. तत्पूर्वी पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने सापळा लावला. दुपारी पावणेबारा वाजता तक्रादाराकडून चार हजारांची लाच घेताना शिंदेला पकडण्यात आले. जाधव प्रत्यक्षात सापडला नाही, पण त्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर शिंदेच्या जालिहाळखुर्द येथील घरावर छापा टाकून झडती घेतली. (प्रतिनिधी)