शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत १९ जानेवारीस बहुजन क्रांती मोर्चा

By admin | Updated: December 25, 2016 23:47 IST

नियोजनासाठी बैठक : जिल्हाभरातून तीस संघटनांचा सहभाग

सांगली : बहुजन समाजाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी सांगलीत गुरूवार दि. १९ जानेवारीला बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी रविवारी येथे बैठक पार पडली. या बैठकीत सांगलीतील मोर्चा यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुजन क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी रविवारी येथील आरवाडे हायस्कूलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत, १९ जानेवारीला कर्मवीर भाऊराव पाटील चौकापासून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, मराठा, एन.टी., व्ही.जे., एम.बी.सी., एस.बी.सी. व अल्पसंख्याक समूहातील सर्वच धर्मांच्या बंधू-भगिनींना एकत्र आणत मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या सुरूवातीला मुबारक फरास यांनी या आंदोलनाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगत सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले.मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साधना कांबळे, चंद्रकांत लोंढे, चंद्रकांत चव्हाण, अरुण खरमाटे, नामदेव करगणे, शेवंता वाघमारे, मुफ्ती जुबेर, सुरेश दुधगावकर, सुरेश चिखले, विजय भोसले, नामदेव कोरे, भारत ऐवळे, शंकर ऐवळे, अर्जुन मजले, राजू गस्ते आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाभरातून ३० सामाजिक संघटनांनी या मोर्चास पाठिंबा दर्शविला असून संयोजन समितीमध्ये आपली नावे समाविष्ट केली आहेत. यावेळी दत्तात्रय घाडगे, गौतम कांबळे, प्रा. गौतम शिंगे, कैलाश ढोकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)निधीबाबत चर्चा : आर्थिक मदत बहुजन क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीमध्ये मोर्चास लागणाऱ्या निधीवरही चर्चा झाली. यावेळी जमीर जमादार यांनी एक हजार रुपये निधी मुबारक फरास यांच्याकडे सुपूर्द केला, तर मदन जाधव यांनी एक हजार रुपयांचा निधी नामदेव कोरे यांच्याकडे सुपूर्द केला.