सांगली लोकसभेची जागा जनता दल (सेक्युलर) लढविणार, पक्षीय बैठकीत निर्णय 

By अविनाश कोळी | Published: March 13, 2024 11:41 AM2024-03-13T11:41:26+5:302024-03-13T12:04:50+5:30

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा जनता दलामार्फत (सेक्युलर) पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये घेण्यात आला. आगामी लोकसभा ...

Janata Dal will contest Sangli Lok Sabha seat, decision in party meeting | सांगली लोकसभेची जागा जनता दल (सेक्युलर) लढविणार, पक्षीय बैठकीत निर्णय 

सांगली लोकसभेची जागा जनता दल (सेक्युलर) लढविणार, पक्षीय बैठकीत निर्णय 

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा जनता दलामार्फत (सेक्युलर) पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीमध्ये घेण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड येथे जनता दलाच्या सांगली जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये जनता दलाचे दिवंगत माजी प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या विचाराने पुढील राजकारणाची दिशा ठेऊन आगामी सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी प्रदेश जनता दलाचे सचिव प्रेमचंद पांड्याजी, महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष डॉ. जयपाल चौगुले पश्चिम महाराष्ट्र युवा जनता दल प्रमुख अॅड. फैय्याज झारी, महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष सुमित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, जिल्हा सचिव जनार्धन गोंधळी, माजी नगरसेवक बाळासाहेब बोरगावे, शफीक बुऱ्हाण, मिरज तालुका प्रमुख संजय ऐनापुरे, कवठे महांकाळ प्रमुख प्रमोद ढेरे, उपाध्यक्ष साहेबउद्दीन मुजावर, प्रा. सलीम सय्यद, डॉ. प्रा. लक्ष्मण शिंदे यांनी संघटन बांधणी मजबुत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी लोकसभा ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त करून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन पांड्याजी यांनी केले. 

Web Title: Janata Dal will contest Sangli Lok Sabha seat, decision in party meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.