शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नशेच्या इंजेक्शनचे उत्तर प्रदेशातून वितरण, मुख्य पुरवठादार जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:59 IST

वितरण साखळी मुरादाबादपर्यंत, आरोपींची संख्या १३ वर

मिरज : वैद्यकीय वापरासाठी असलेले, मात्र नशेसाठी वापर होणाऱ्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा पुरवठा उत्तर प्रदेशातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. गांधी चौक पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून इंजेक्शनचा मुख्य पुरवठादार इंतजार अली जहीरुद्दीन यास अटक केली. न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.मिरजेतील गांधी चौक पोलिसांनी दि. २० रोजी वैद्यकीय वापरासाठी असलेल्या मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा सांगली, मिरज परिसरात नशेसाठी विक्रीसाठा करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मेफेन्टरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा ६ लाख १६ हजार रुपये किमतीचा अवैध साठा, ८ लाख ३० हजारांचे चारचाकी व दुचाकी वाहन असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या सांगलीतील तीन आरोपींची कसून चौकशी करून मेफेन्टरमाइन इंजेक्शनची वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड केली. सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात वितरण, विक्री व साठा करणारे रोहित कागवाडे (रा. सांगली), ओंकार मुळे (रा. सांगली), अशपाक पटवेगार (रा. सांगली), वैभव उर्फ प्रशांत पाटोळे (रा. कडेगाव), ऋतुराज भोसले (सांगलीवाडी), अमोल मगर, साईनाथ वाघमारे, अविनाश काळे, देवीदास घोडके (सर्व रा. माळशिरस), आकाश भोसले (रा. माण), हनुमंत शिंदे (रा. माळशिरस), ललित पाटील (रा. शाहूवाडी) या बारा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.नशेसाठी वापर होणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा कोठून होतो, याचा तपास करताना सांगलीतील अशपाक पटवेगार हा काळ्या बाजारातून अवैध मार्गाने उत्तर प्रदेश मुरादाबाद येथील इंतजार अली जहीरुद्दीन याच्याकडून मेफेन्टरमाइन इंजेक्शन मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने उत्तर प्रदेशात मुरादाबाद येथून इंतजार अली जहीरुद्दीन यास ताब्यात घेऊन मिरजेत आणले. मिरज न्यायालयाने इंतजार अली जहीरुद्दीन यास तीन दिवस पोलिस कोठडी दिल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस