शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संघटनांच्या वादात पगारवाढीचा निर्णय लटकला

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

जिल्हा बँक : कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर; पुढील बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन

सांगली : कर्मचाऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या संघटनांच्या वादात जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय लटकला. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय होईल या अपेक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा, निर्णयाविना बैठक संपल्याने मोठा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. पगारवाढीचा प्रस्ताव सांगलीच्या को-आॅप. बँक्स एम्प्लॉईज युनियनने दिला होता. संघटनेने १५ ते १८ टक्के पगारवाढीची मागणी केली होती. अध्यक्षांसह संचालकांनी हा निर्णय अभ्यासाअंती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतचा अभ्यास सुरू असला तरी अंतिम निर्णयाप्रत येण्यासाठी आणखी काही दिवस तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. संचालकांनी ही तांत्रिक बाजू मांडली असली तरी दोन युनियनच्या वादात पगारवाढीचा निर्णय लांबणीवर गेल्याची चर्चा जिल्हा बँकेत होती. सांगली व कोल्हापूर अशा दोन युनियनचा पूर्वीपासून वाद आहे. एका संघटनेने प्रस्ताव देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. आता पगारवाढीच्याच प्रस्तावावर दुसऱ्या संघटनेशीही चर्चा केली जाणार आहे. (प्रतिनिधी)