शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात विरोधकांच्या बेरजेत वजाबाकीच जास्त

By admin | Updated: November 25, 2015 00:33 IST

राष्ट्रवादीविरोधात दमछाक : नगरपालिकेतील राजकारण, भक्कम नेतृत्वाचा अभाव

अशोक पाटील -- इस्लामपूर  पालिकेत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदाचा फटका त्यांना कधीच बसलेला नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात अनेकवेळा आघाड्या झाल्या. मात्र निवडणुकीपुरते एकत्र येऊन गोळाबेरीज करणाऱ्या विरोधकांची बेरीज नेहमीच वजा राहिली आहे. आगामी काळातही इस्लामपुरात राष्ट्रवादीला आव्हान देणाऱ्या विरोधकांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.काँग्रेसचे वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार, भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील, विजय कुंभार, शिवसेनेचे आनंदराव पवार, महाडिक गटाचे राहुल महाडिक, सम्राट महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते आमदार पाटील यांना नेहमीच विरोध करत आले आहेत, परंतु भक्कम नेतृत्वाअभावी त्यांचे आव्हान नेहमीच तुटपुंजे ठरत आले आहे.भाजपचे बाबासाहेब सूर्यवंशी सत्ताधाऱ्यांविरोधात प्रामाणिकपणे लढा दिल्याचा दावा करत आहेत. एकाकी लढणाऱ्या सूर्यवंशी यांचा आवाज दाबण्यात राष्ट्रवादीतील काही नेत्यांना यश आले आहे. परंतु येणाऱ्या काळात हा प्रामाणिकपणा जनतेपुढे येईल, तेव्हाच आपण बोलू, अशी भूमिका सूर्यवंशी यांनी घेतली आहे.विक्रमभाऊ पाटील हे तर आपणच भाजपचे नेते असल्याचे सांगतात. कोणतीही तडजोड करण्यास ते तयार नाहीत. येणाऱ्या काळात भाजपच्या ताकदीवर सत्ताधाऱ्यांतील काही मासे गळाला लावू, असा दावा त्यांनी केला आहे. बाहेरची ताकद न घेता विरोधी गट भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.विरोधी नगरसेवक आनंदराव पवार, कपिल ओसवाल यांना पालिकेतील प्रशासनाचा आणि कारभाराचा अभ्यास नाही. त्यामुळे विरोधी गटाची जबाबदारी भाजपचे विजय कुंभार यांच्यावर आली आहे. ते फक्त कागदोपत्री लढाया करत आहेत. त्यांना इतर कोणाचीही साथ मिळत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी ‘हम करेसो कायदा’ असा कारभार सुरू ठेवला आहे.गत नगरपालिका निवडणुकीत विरोधकांनी मोट बांधली होती. मात्र ऐनवेळी मीपणा मध्ये आल्याने पदरात पडणाऱ्या आठ ते १० जागा गमावल्या. तेव्हापासून आजतागायत विरोधकांना उभारी घेता आली नाही. तथापि पेठनाक्यावरील महाडिक गटाची हवा कायम आहे. आगामी काळात विरोधक एकत्र न आल्यास आम्ही स्वत:चे वेगळे पॅनेल करू, असा इशारा जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.गत निवडणुकीत विरोधकांतील अंतर्गत गटबाजीमुळे चटके बसले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचे काम करावे लागणार आहे. इस्लामपूर येथे आमचे मतदान आहे. त्यामुळे विरोधी गट भक्कम करणे हे आमचे कर्तव्यच आहे.- सम्राट महाडिक, जि. प. सदस्य