शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेतील भाजप सत्तेतच्या श्रीगणेशालाच गटबाजीचा भडका, सभापती निवडीने अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 19:06 IST

आमदार-महापौरांत दुरावा

शीतल पाटीलसांगली : महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर एकजूट दिसेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात नेते आणि पदाधिकाऱ्यांमधील दुरावा वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सभापती निवडीवेळी हा अंतर्गत संघर्ष उघडपणे दिसून आला. त्यातच भाजपचे आमदारसुधीर गाडगीळमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्यातील राजकीय दरीही रुंदावल्याचे दिसत आहे. सत्ताधारी पक्षात कलह निर्माण झाल्याने गटबाजीचा भडका उडाला आहे.गेल्या वर्ष-दीड वर्षात भाजपतर्गंत वेगवेगळे गट कार्यरत आहेत. निवडणुकीपूर्वी आमदार गटाने निष्ठावंताचा मुद्दा उपस्थित करीत गटबाजी पहिल्यांदा चव्हाट्यावर आणली. त्यानंतर महापालिका निवडणुकीत उमेदवारी यादीवरून दोन्ही गटात शह-कटशहाचे राजकारण रंगले होते. त्याचा फटका भाजपला बसला. गतवेळी बहुमतात असलेली भाजप यंदा काठावर पास झाली. त्यानंतर महापौर निवडीवेळीही थोडा संघर्ष झाला होता. पण तो चव्हाट्यावर आला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर-उपमहापौर निवडीची सुत्रे हाती घेतली. पण आता विषय समित्यांच्या सभापतिपदावरून भाजपगर्तंत कलह समोर आला आहे. सभापती पदासाठी नाव निश्चित करताना नेत्यांच्या गटाकडून आपापल्या समर्थकांना संधी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. त्यातून महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सभापतीपद देण्यावरून महापौरांसह काही पदाधिकारी नाराज झाले.महापालिकेच्या सातही समितीवर भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) युतीचे वर्चस्व आहे. विशेषत: प्रभाग समितीत बहुमत आहे. तरीही विरोधी काँग्रेसला एक सभापती देण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यातही महापौरांचीच प्रभाग समिती एक काँग्रेसला देण्यात आली. या समितीच्या सभापतिपदासाठी महापौरसमर्थक रईसा शिकलगार यांनी अर्ज दाखल केला होता. निवडीवेळी त्यांचा अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणखी वाढली.भाजपने महापालिकेत सत्ता मिळवली असली तरी नेतृत्वातील समन्वयाचा अभाव अधोरेखित होत आहे. पद वाटप आणि निर्णय प्रक्रियेत काहींची मते डावलली जात असल्याची तक्रार कार्यकर्त्यांतून पुढे येत आहे. त्यामुळे पक्षातील दोन गटांमधील तणाव वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेते या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी सभापती निवडीच्या निमित्ताने उफाळून आलेले नाराजी नाट्य थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. आगामी काळात पदवाटप, समित्या आणि धोरणात्मक निर्णयांवरून ही गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

महापौरांची अनुपस्थिती चर्चेतसभापती निवडीवेळी महापौर धीरज सूर्यवंशी महापालिकेत थांबून होते. प्रभाग समिती एकच्या निवडीसाठी ते बैठकीला हजर होते. पण काही वेळानंतर सभापतींच्या सत्कारासाठी आमदार सुधीर गाडगीळ महापालिकेत आले. ते थेट स्थायी सभापतींच्या दालनात गेले. तिथे पाचही सभापतींचा सत्कार करण्यात आला. स्थायी सभापतींना खुर्चीवरही बसविले. फोटोसेशनही झाले. पण साऱ्यात कुठेच महापौरांची उपस्थितीत नव्हती. महापौरांची गैरहजेरीचा मुद्दाही नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पण त्यांनी हसत तो टाळला.

सत्तेच्या श्रीगणेशालाच गटबाजीची किनारमहापौर-उपमहापौर निवडीवेळीही भाजपचे काही नेते अनुपस्थित होते. महापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतरही काहींनी त्यांना शुभेच्छाही दिल्या नसल्याचे समर्थक सांगतात. त्यामुळे आता सभापती निवडीवेळी महापौरांनी घेतलेल्या भूमिकेचेही समर्थन केले जात आहे. त्यात सभापती निवडीसाठी शहरात लावलेल्या डिजिटल फलकावरून महापौरांचा फोटो गायब आहे. सत्तेच्या श्रीगणेशालाच भाजपमध्ये गटबाजीची किनार स्पष्टपणे दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli BJP Power Play Marred by Factionalism After Committee Selections

Web Summary : Sangli BJP's initial unity fractured post-election, with internal conflicts surfacing during committee selections. Disagreements over power-sharing and perceived slights to key members, including the mayor, exposed deep divisions within the party, threatening future stability and decision-making.