शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ; अपुरी कामे, भरधाव वेग कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:25 IST

महेश देसाई कवठेमहांकाळ : रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर ...

महेश देसाईकवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर घोरपडी ते खरशिंग फाट्यादरम्यान अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर छोट्या मोठ्या अपघातात शेकडो जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा कवठेमहांकाळ तालुक्यात मृत्यूचा सापळा बनला आहे.राष्ट्रीय महामार्गावर असलेली अपुरी कामे तसेच भरधाव वेग, नियम मोडण्यासारख्या मानवी चुका अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहतुकीचे नियम मोडण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे अपघातात वाढ होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाची लांबी खरशिंग फाटा ते घोरपडी दरम्यान ३५ किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीतील खरशिंग ते घोरपडी दरम्यान अपघाताची संख्या वाढली आहे.बहुतांश अपघातांमागे अतिवेगाने वाहन चालविणे हे प्रमुख कारण आढळून आले आहे. वेगाची मर्यादा न राखणे हेही त्यातील एक कारण आहे. महामार्ग प्रशासनाकडून अपघाताची ठिकाणे व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काही ठिकाणी केल्या नाहीत. वाहनधारकांना महामार्गावर आवश्यक त्या सोयीसुविधाही दिल्या जात नाहीत. मात्र, दुसरीकडे बोरगाव येथे नित्यनियमाने टोल वसुली मात्र जोमाने केली जात आहे.अपघातात वाढरत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री अपघातात म्हैसाळमधील तीन महिला मजूर ठार झाल्या तर अनेक जण लहान मुलासह गंभीर जखमी झाले. हा अपघात ट्रक चालकाने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.उपाययोजनांचा अभावपंढरपूर, तुळजापूर तसेच अक्कलकोट, कोल्हापूर येथील महालक्ष्मी, गणपतीपुळेला जाणारे लाखो भाविक या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा वापर करतात. वाहनांसोबतच पायी जाणारे भाविक, दिंड्यांची संख्याही या मार्गावर मोठी आहे. महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अभाव प्रशासनाकडून पाहावयास मिळत आहे.

चारचाकी वाहने अति वेगाने वाहनधारक चालवतात, तर दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करीत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाचे नियम अजून माहिती नाहीत. ते रस्त्याच्या विरोधी दिशेने जात असतात. वाहनधारकांनी नियम पाळणे गरजेचे. -श्रीकृष्ण नवले, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलिस ठाणे, कवठेमहांकाळ.

टॅग्स :SangliसांगलीRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गAccidentअपघात