शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

इस्लामपुरात गुंडाचा डोक्यात शस्त्राचे वार आणि दगड घालून खून

By श्रीनिवास नागे | Published: June 07, 2023 11:36 AM

तीन ते चार हल्लेखोरांचा समावेश 

इस्लामपूर : इस्लामपूर शहरात गुन्हेगारीतील वर्चस्ववाद आणि टोळीयुद्धातून रात्री ११ च्या सुमारास बहे रस्त्यावरील रिंग रोडवर २७ वर्षीय गुंडाचा डोक्यात, चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करत आणि दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली. बारमध्ये झालेल्या वादावादीनंतर बाहेर पडल्यावर या गुंडाचा खून करण्यात आला

प्रकाश महादेव पुजारी (२७, रा.औद्योगिक वसाहत, दूध संघाच्या पाठीमागे, इस्लामपूर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी आणि गंभीर शारीरिक दुखापत करण्याच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील हल्लेखोर हे मोक्का कारवाईतून जामीनावर बाहेर आल्याची चर्चा आहे. तसेच हा खून वर्चस्ववादातून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.प्रकाश उर्फ पक्या पुजारी या नावाने खून झालेला गुंड गुन्हेगारी वर्तुळात परिचित होता. मंगळवारी रात्री तो बहे रस्त्यावरील एका बारमध्ये बसला होता. त्यावेळी संशयीत हल्लेखोरही त्याच बारमध्ये आले होते. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. तेथून बाहेर बसल्यावर रस्त्याकडेच्या अंधारात त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यातून हल्लेखोरांनी धारदार हत्याराने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुजारी याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र गंभीर दुखापत पाहून त्याला पुढे पाठविण्यात आले. यादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. पहाटे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शव विच्छेदन करण्यात आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे दिसत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही दाखल झाले आहे. याबाबत रोहन रविंद्र इचुर याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजराज पाटील, सागर म्हस्के, अकिब पटेल आणि एका अनोळखी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली