शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या दुर्लक्षाचा गुऱ्हाळांवर परिणाम

By admin | Updated: November 25, 2015 00:31 IST

शेतकरी संघटनांचेही दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे --गुऱ्हाळघरांना घरघर-३

सहदेव खोत -पुनवत -गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य दर मिळवून देण्याकामी कृषी उत्पन्न बाजार समित्या, शासन व शेतकरी संघटना यांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरत आहे. बाजार समित्यांचा व्यापारी व अडते यांच्यावरील वचक कमी झाल्याने गूळ उत्पादकांची हानी होऊ लागली आहे. परिणामी दर मिळत नसल्याने शेतकरी गूळ निर्मितीपासून दूर जाऊ लागला आहे. गूळ उद्योगाबाबतीत कोल्हापूर, कऱ्हाड येथील कृषी उत्पन्न बाजार समित्या दुर्लक्ष करीत असल्याचे गुऱ्हाळमालक व उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. बाजार समित्यांच्या दुर्लक्षामुळेच व्यापारी व अडते यांच्याकडून पिळवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. प्रतिवर्षी उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) दरासाठी टाहो फोडणाऱ्या शेतकरी संघटना गूळदरासाठी फारशा आक्रमक होताना दिसत नाहीत. (समाप्त)गुऱ्हाळांच्या ऱ्हासाला : मालकांची बेकी जबाबदारगुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाला गुऱ्हाळ मालकांची बेकी कारणीभूत ठरत आहे. गुऱ्हाळ मालकांच्या संघटना नाहीत. संघटना असतील तर समन्वय नाही. परिणामी अशा परिस्थितीत फक्त गूळ उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. गूळदरासाठी गुऱ्हाळमालकांनी ‘गुऱ्हाळघरे बंद’सारखे हत्यार उपसल्यास व्यापारी, अडते यांना चाप बसणार आहे.गुऱ्हाळघरातून उच्च प्रतीचा गूळ बाजारपेठांत पाठविण्यासाठी प्रयत्न होतात. अनेकवेळा बारीक कणी, चांगला रंग, चांगली चव असूनही शेतकऱ्यांच्या गुळाला व्यापारी न्याय देत नाहीत. व्यापाऱ्यांनीच गुळाला दर देऊन हा उद्योग टिकविण्याची गरज आहे.- दत्ता पाटसुते, कासेगाव, गुळवे, नेर्ले, ता. शाहुवाडी.गुळाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. घाणाभाडे, वाहतूक, हमाली, अडत, तोलाई, तोडणी वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. व्यापाऱ्यांनी गूळ उत्पादकांना न्याय दिला तरच शेतकरी गुऱ्हाळ उद्योगाकडे वळतील.- बाबासाहेब वरेकर, गूळ उत्पादक, खवरेवाडी.