शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हळदीची खरेदी नाफेडमार्फत झाली तर मिळणार झळाळी, हमीभावाविषयी शासन स्तरावर उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 13:35 IST

कृषी आयुक्तालयाच्या अहवालानुसार जगभरात तब्बल ८१ टक्के हळदीचे क्षेत्र भारतात

सांगली : शेतकऱ्याला चांगले पैसे मिळवून देणाऱ्या आणि देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत भर टाकणाऱ्या हळदीला हमीभावाविषयी शासन स्तरावर उदासीनता आहे. हमीभावाअभावी व्यापारी स्वत:च दर ठरवतात. हळदीची खरेदी नाफेडमार्फत झाल्यास अधिक दर मिळेल असा सूर आहे.राज्यात सर्वाधिक हळद मराठवाड्यात पिकते. सांगलीची हळदही जगप्रसिद्ध आहे. सांगली बाजार समितीत २०१३ पासून सरासरी पाच हजार ते दहा हजार रुपये इतकाच प्रतिक्विंटल दर राहिला आहे. उच्च दर्जाची हळद १४ हजारांना, तर बाकीची सहा-सात हजारांना विकली गेली. प्रतिएकरी उत्पादनखर्च दोन ते अडीच लाख रुपये आहे. खर्च वजा जाता कसेबसे ५० हजार रुपयेच राहतात. त्यामुळे हळदीला हमीभावाची मागणी होत आहे. दरवाढीमुळे लागवडीला चालना मिळणार आहे. रोगराई, प्रतिकूल हवामान, अतिवृष्टी अशा संकटातही हळद तग धरत असल्याने शेतकऱ्याला हमखास उत्पन्नाचा स्रोत मिळेल, असा सूर आहे.

८१ टक्के वाटा भारताचा

कृषी आयुक्तालयाच्या अहवालानुसार जगभरात तब्बल ८१ टक्के हळदीचे क्षेत्र भारतात आहे. चीन ७ टक्के, म्यानमार ४ टक्के, नायजेरिया व बांगलादेश ३ टक्के आणि व्हिएतनाम व श्रीलंका प्रत्येकी १ टक्के हळद पिकते. देशात २०१९-२० मध्ये २ लाख १८ हजार हेक्टर हळदीची लागवड झाली, त्यापैकी ५४ हजार ८८५ हेक्टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात होते. इतक्या मोठ्या प्रमाणात हळद असतानाही तिला हमीभाव नाही.

८० टक्के हळद मराठवाड्यात

महाराष्ट्रात २०२१-२२ मध्ये १ लाख २ हजार हेक्टरवर हळद पिकली. त्यापैकी ८० टक्के म्हणजे ८२ हजार ९ हेक्टर मराठवाड्यात झाली. सांगली जिल्ह्यात ९०९ हेक्टर क्षेत्रावर हळद आहे. हळदीच्या उत्पादन व वितरणासाठी शासनाने नुकतेच १०० कोटी रुपये मंजूर केले, पण हमीभावाचा विचार मात्र विचार केला नाही.

हळदीसाठी नऊ महिने शेती अडकून पडते. एकरी कमाल ३० टन उत्पादन होते. कसेबसे ५० हजार रुपये शिल्लक राहतात. नाफेडने खरेदी केल्यास जास्त दर मिळेल. - दिलीप बुरसे, हळद उत्पादक शेतकरी, बेडग 

किमान हमीभावाच्या यादीत हळद नाही, त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी शक्य नाही. सांगलीत स्पर्धेमुळे चांगला दर मिळतो. नाफेडमार्फत खरेदी झाल्यास सरसकट दर मिळेल, बाजारात दर्जेदार हळद येणार नाही. - दिनकर पाटील, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Sangliसांगली