शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करू : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 3:50 PM

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करून कवठेमहांकाळ, तासगावसह जिल्ह्यातील शंभर टक्के गावांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे, शासनाकडून लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. 

ठळक मुद्देसिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करू : जयंत पाटीलम्हैसाळ योजनेच्या कामाचा घेतला आढावा

सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांची कामे जूनपर्यंत पूर्ण करून कवठेमहांकाळ, तासगावसह जिल्ह्यातील शंभर टक्के गावांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न आहे, शासनाकडून लागेल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. पाटबंधारे कार्यालयात तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ताकारी, म्हैसाळ योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदामंत्री पाटील यांनी सांगलीत अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. जूनची मुदत असल्याने ती कामे पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर गतीने प्रयत्न आहेत. जिल्ह्यातीलच योजना नव्हे, तर महाराष्ट्रातील सिंचन योजनांची सर्व कामे पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न चालू आहे. पाणी योजना पूर्ण करण्यासाठी निधीची उपलब्धता केली जात आहे.कोणत्याही योजनांची कामे अपूर्णावस्थेत थांबणार नाहीत, याबाबतची दक्षता घेण्यात आली आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावांत ताकारी व म्हैसाळ योजनेचे पाणी गेलेले नाही. तासगावमधील सहा गावांचा समावेश आहे. त्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी वंचित गावांना पाणी देण्याबाबत चर्चा केली आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील वंचित गावांना लवकरच पाणी उपलब्ध करुन दिले जाईल. जिल्ह्यातील गावांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.आ. सुमनताई पाटील, सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य सतीश पवार, अर्जुन पाटील यांनी, तालुक्यातील काही गावांना पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली. यावर जयंत पाटील यांनी, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करुन त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, दत्ताजीराव पाटील, भानुदास पाटील, सागर पाटील, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे उपस्थित होते.

टॅग्स :Tembhu Projectटेंभू धरणJayant Patilजयंत पाटीलSangliसांगलीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प